What is insurance | विमा म्हणजे काय ?

या पोस्टला नक्की शेअर करा 😜

नमस्कार मंडळी ! आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला विमा म्हणजे काय what is insurance याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. विमा म्हणजे काय, तो कसा घ्यावा, त्याचे फायदे – तोटे याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

What is insurance | विमा म्हणजे काय ?

मित्रानो insurance म्हणजेच विमा हा शब्द आपल्या दैनंदिन व्यवहारात खूप वेळा आपल्या कानावर पडतो , बहुदा आपण देखील इन्शुरन्स या शब्दाचा व्यवहारात कधीतरी वापरत असतो. पण बहुतेक लोकांना विमा म्हणजे काय (what is insurance) बद्दल माहिती नसते. आपण बहुतेक वेळा एकतो मी health insurance जीवन विमा काढला, मी कारचे इन्शुरन्स काढले, मी घराचे insurance काढले. पण insurance चा सोप्या भाषेत अर्थ काय आज आपण जाणून घेणार आहोत.

What is insurance | विमा म्हणजे काय ?

विमा हा विमा हा एक करार आहे जो विमा कंपनी आणि विमा धारक लोकांचा होता. किंवा विमा कंपनी मध्ये अनेक अटी आणि नियम नमूद केले जातात जर ते निश्चितपणे अपघाताच्या वेळेस व्यक्तींना नुकसान पोहोचवतील किंवा विमा कंपनीने तुमचा उद्योग केला असेल तर त्याला विमा म्हणतो.

विमा हा तुमचा व्यवस्थापन करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तुम्ही तुमच्या कंपनीचा विमा खरेदी कराल की तुम्ही अनपेक्षित आर्थिक नवसानीची सुरक्षा विकत घेऊ शकता. अनपेक्षित किंवा अकस्मात आर्थिक अपघाताची आर्थिक नुकसानीची भरपाई विमा कंपनी तुम्हाला देत असते.

विमा पॉलिसी (insurance policy) अंतर्गत तुम्हाला दरवर्षी एक विशिष्ट रक्कम विमा कंपनीला द्यावी लागते. तुम्हाला विमा कंपनीला किती पैसे द्यावे लागतात आणि ते किती कालावधीनंतर द्यावे लागतात हे तुम्ही कोणती विमा पॉलिसी घेतली आहे यावर निर्भर असते.

Types of insurance policy | विमा पॉलिसीचे प्रकार

विम्याचे अनेक प्रकार आहेत पण त्यातील काही सामान्य प्रकार खाली दिलेले आहेत.

  1. Health insurance (आरोग्य विमा) : अपघात झाल्यानंतर तुम्हाला डॉक्टरांची आणि औषध गोळ्यांची फीस भरण्यास मदत करते
  2. Home insurance (घर विमा ) : जर एखाद्या नैसर्गिक आपत्तीत किंवा इतर काही कारणास्तव तुमच्या घराचे किंवा घरातील मालमत्तेचे नुकसान झाले तर तुम्हाला हा विमा आर्थिक मदत करतो
  3. Vehicle insurance (वाहन विमा) : यात car insurance, auto insurance असे अनेक प्रकार आहेत. एखाद्या अपघातात जर तुमच्या वाहनाचे आर्थिक नुकसान झाले तर हा वाहन विमा तुम्हाला आर्थिक मदत करतो
  4. Disability insurance (अपंगत्व विमा) : हा विमा वयक्तिक अपंग व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक संकटाच्या वेळी मदत करते
  5. Life insurance (जीवन विमा) : हा विमा एखाद्या व्यक्तीच्या मृतयूनंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करते

Insurance policy (विमा पॉलिसी) खरेदी करते वेळेस कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात ?

विमा पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला थोडे संशोधन करावे लागेल की कोणती विमा पॉलिसी तुमच्यासाठी उत्तम आहे. नेहमी अशीच विमा पॉलिसी घेण्याचा विचार करा ज्यातून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल म्हणजेच अपघातात तुमच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची योग्य भरपाई तुम्हाला मिळेल. अनेक अशा कंपन्या देखील आहेत ज्या विमा पॉलिसी च्या नावावर ग्राहकांची फसवणूक करतात. त्यामुळे अशा फ्रौड विमा कंपन्या पासून सावध रहा.

तुम्ही ज्या विमा कंपनीकडून विमा घेत आहात त्या कंपनीची अगोदर चौकशी नक्की करा. तुम्ही ज्या विमा कंपनीकडून विमा खरेदी करणार आहात ती कंपनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असायला हवी तसेच कंपनी उत्तम सेवा प्रधान करणारी देखील असायला हवी.

तसेच विमा खरेदी करताना कोणते घटक महत्वाचे आहेत ते शोधा जेणेकरून तुम्हाला सर्वोत्तम किमतीत आवश्यक असलेले कव्हरेज मिळू शकेल.

How does insurance policy work? | विमा पॉलिसी कसे कार्य करते ?

बहुधा अनेक विमा पॉलिसी या काही विशिष्ट कालावधीसाठी संदर्भित असतात. म्हणजेच त्या विमा पॉलिसी केवळ एकद्या विशिष्ट मुदतीसाठी असतात आणि ती मुदत संपल्यानंतर आपल्याला ती विमा पॉलिसी renew करावी लागते किंवा ती पुन्हा खरेदी करावी लागते.

विमा पॉलिसी खरेदी केल्यानंतर तुम्हाला एका विशिष्ट कालावधीनंतर नियमित हफ्ता द्यावा लागतो त्याला इंग्रजीत premium असे म्हटले जाते. काही विमा पॉलिसीचे हफ्ते हे मासिक असतात म्हणजे प्रत्येक महिन्याला विशिष्ट रक्कम म्हणजे हफ्ता विमा कंपनीला द्यावा लागतो. जसे की जीवन विमा (health insurance).

विमा कंपनीला हफ्ता देण्याचा कालावधी हा त्या विमा पॉलिसीचे प्रकारावर अवलंबून असतो. जसे की जीवन विमा पॉलिसीचे बहुदा मासिक हफ्ते असतात आणि वाहन विमा (vehicle insurance) किंवा घर विमा (home insurance) यांचे हफ्ते वार्षिक असतात.

तुमच्या प्रीमियम ची किंमत तुम्हाला किती धोका आहे यावर अवलंबून असते तसेच तुम्ही कोणत्या वस्तूवर विमा घेत आहेत यावर देखील अवलंबून असते.

तुम्ही विमा पॉलिसी खरेदी केल्यानंतर विमा कंपनी तुमच्याकडून मासिक किंवा वार्षिक हफ्ते वसूल करते आणि जेंव्हा तुमच्यासोबत एखादा अपघात होतो तेंव्हा तुमचे जेवढे आर्थिक नुकसान होईल त्यातील काही विशिष्ट रक्कम विमा कंपनी तुम्हाला देत असते त्यालाच आपण विमा मिळाला असे म्हणतो. अशा प्रकारे विमा पॉलिसीचे कार्य असते.

विमा (insurance policy) तुमचा आर्थिक धोका कसा कमी करतो ?

तुम्ही जर विमा पॉलिसी खरेदी केली तर तुम्ही ज्या वस्तूवर विमा खरेदी केला आहे त्या वास्तूची नुकसान भरपाई देण्याचे कार्य हे विमा कंपनीचे आहे असे विमा पॉलिसी मध्ये नमूद केलेले असते. यात विमा धारक आणि विमा कंपनी यांच्यात करार झालेला असतो.

उदाहरणात समजा तुम्ही कार चालवत आहात आणि अचानक तुमच्या कारचा अपघात झाला आणि जर तुम्ही तुमच्या कार वर विमा पॉलिसी खरेदी केलेली असेल आणि नियमित हफ्ता भरत असाल तर तुमच्या कारच्या नुकसान भरपाईसाठी विमा कंपनी तुम्हाला पैसे देते त्यामुळे तुमच्यावरील आर्थिक संकट दूर होऊ शकते.

तसेच तुम्ही स्वतःचा जीवन विमा म्हणजेच health insurance घेतलेला असेल आणि जर या अपघातात तुम्हाला काही शारीरिक इजा झाली तर तुमच्या दवाखान्याचा खर्च विमा कंपनी उचलते.

तसेच काहीजण घरावर देखील विमा घेतात त्याला home insurance असे म्हणतात. जर एखाद्या नैसर्गिक आपत्तीत जसे की नदीचा पुर, पाऊस, चक्रीवादळ यात तुमच्या घराचे किंवा घरातील मालमत्तेचे नुकसान झाले तर त्याची भरपाई तुम्हाला विमा कंपनी देते.

अशा प्रकारे तुमच्या संकटाच्या वेळी विमा कंपनी तुम्हाला आर्थिक मदत करते. पण त्यागोदर तुम्ही तुमची विमा कंपनीचे नियमित हफ्ते भरत असायला हवेत आणि हे ही लक्षात असू द्या की तुम्हाला विमा पॉलिसी चा तेंव्हाच फायदा होईल जेंव्हा तुमचा अकस्मात मोठा अपघात होईल आणि तुमचे आर्थिक नुकसान झालेले असेल.

आपण काय शिकलो ?

मित्रानो आजच्या या पोस्टमध्ये आपण विमा म्हणजे काय what is health insurance जाणून घेतले तसेच विमा योजना म्हणजे काय what is health insurance in marathi, विम्याचे प्रकार types of insurance यासारख्या अनेक प्रश्नांची माहिती जाणून घेतली.

मला आशा आहे की तुम्हाला विमा म्हणजे काय या पोस्टमध्ये दिलेली सर्व माहिती नक्कीच समजली असेल, धन्यवाद…!


या पोस्टला नक्की शेअर करा 😜

Leave a Comment

x