Fathers day wishes in marathi | Fathers day quotes, status, images | पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022

या पोस्टला नक्की शेअर करा 😜

Fathers day wishes in marathi पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, फोटो, बॅनर: नमस्कार मंडळी! सर्वप्रथम तुम्हा सर्वांना पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (happy fathers day wishes in marathi) आज २० जून २०२२ रोजी या वर्षीचा पितृ दीन (fathers day) आहे. आजच्या दिवसाचा आवचीत्य साधून तुमच्या वडिलांना फादर्स डे च्या शुभेच्छा नक्कीच द्या.

आई वडील हे आपले प्रथम गुरू असतात. आई आपल्याला चालायला, बोलायला शिकवते तर वडील आपल्याला समाजात वावरायला शिकवतात. आपण आईची महिमा नेहमी गातो पण वडीलान वरील प्रेम व्यक्त करायला आपल्याला कधी संधीच मिळत नाही.

आपल्या आयुष्याचा खरा शिल्पकार “बाप” जरी असला तरी तो नेहमी अंधारातच असतो, आपणाला कधीही त्यांची स्तुती करण्यासाठी वेळ मिळत नाही. आपल्याला स्वयंपाक घरात काम करणारी आई आठवते पण दिवसरात्र शेतात घाम गळणारा, ऑफिसात उशीरा पर्यंत काम करणारा बाप कधीच आठवत नाही ! आपल्याला लग्नसोहळा, कार्यक्रमात आईची लगबग दिसते परंतु त्याच सोहळ्यासाठी लागणारी कॅपिटल जमा करणाऱ्या बापाची धडपड आपल्याला कधीच जाणवत नाही.

सर्व कवी लेखक देखील आई वरच कविता लेख लिहितात, परंतु जीर्ण कपड्यात वावरणाऱ्या बापाच्या व्यथा मात्र कुणालाच समजत नाहीत. काही कलाकारांनी बाप रेखाटला मात्र तो दारू पिणारा, बायका पोरांना मारणारा, शिवीगाळ करणारा पण कुटुंबाच्या भवितव्यासाठी जघडणारा बाप कुणाच्याही लक्षात आला नाही, हे दुर्दैव !

मुली देखील स्टेटस ला ठेवतात fathers queen, बापाची परी पण त्या परीला देखील कधी बापाची स्तुती करायला, त्यांनी तिच्यावर केलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद द्यायला वेळ मिळत नाही. अहो, कुणालाही आपण केलेल्या कार्याबद्दल स्तुती ऐकायला आवडते, दिलासा मिळतो, केलेले कार्य सार्थक झाले असे भासते. पण ही स्तुती ऐकणं बापाच्या नशिबीच नसावं बहुतेक !

आज पितृ दीन आहे, आजवर जरी तुम्हाला आपल्या बापाला धन्यवाद द्यायला आणि त्यांची स्तुती करण्यासाठी वेळ मिळाला नसेल तर आज सुवर्ण संधी आहे. आज उठल्या नंतर सर्वात पाहिले तुमच्या वडिलांच्या पाया पडून त्यांना पितृ दिनाच्या शुभेच्छा नक्की द्या.

Fathers day quotes in marathi
Fathers day wishes in marathi

त्यांनी तुमच्यावर केलेल्या प्रेमाची कृतज्ञता व्यक्त करा, त्यांना नेहमीच्या कामापासून आज थोडी विश्रांती द्या आणि आज covid-१९ महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन सध्या पद्धतीने fathers day सेलिब्रेट करा. जमलच तर त्यांना नक्की म्हणा ” you deserve the better son/daughter dad! You are my real hero!” त्यांच्या डोळ्यातून नक्कीच आनंद आश्रु येतील.

आजच्या या लेखामध्ये आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पितृ दिनाच्या शुभेच्छा, fathers day wishes in marathi, fathers day quotes in marathi, fathers day images, banner, photo….

Father’s day 2022: पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | fathers day wishes in marathi | fathers day quotes in marathi

पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | father’s day wishes in marathi

खिसा रिकामा असला तरीही
कधी नाही म्हणाले नाही,
माझ्या बाबापेक्षा
श्रीमंत मी कधी पाहिला नाही.
🌷Happy Father’s day.🌷

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे🙏

बाबांचा मला कळलेला अर्थ
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट
करणारे शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी
करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा
बाजूला ठेऊन
मुलांसाठी झटणारं अंतःकरण.
🌷Happy Father’s day.🌷

बाप असतो तेलवात,
जळत असतो क्षणाक्षणाला..
हाडांची काडे करून
आधार देतो मनामनाला…
🌷हॅप्पी फादर्स डे!🌷

एकमेव माणूस जो माझ्यावर
स्वतःपेक्षा अधिक प्रेम करतो
…तो म्हणजे बाबा.
🌿Happy Father’s day baba.🌿

पितृ दीन शुभेच्छा संदेश | father’s day quotes in marathi

ज्यांनी माझं Status निर्माण केलं
त्या वडिलांना या Status
मधून हजार वेळा दंडवत!
🥳हॅप्पी फादर्स डे!🥳

माझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की, त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे – happy fathers day!💐

आपन फक्त ‪आई बाबांच्या
‬ पाया पडतो, आणि ‪‎
देवापूढे‬ हात ‪‎जोडतो
बाकी जो जास्तीच ‪उडतो‬,
त्याला नारळागत ‪‎फोडतो‬…
❤️हॅप्पी फादर्स डे!❤️

तुम्ही कितीही मोठे झाला तरीही 
असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही 
मोठा माणूस म्हणूनच पाहणार आणि तो म्हणजे बाबा – पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

पितृ दीन शुभेच्छा संदेश, फोटो, बॅनर | Father’s day images, photo banner

माझ्या वडिलांनी मला
कसं जगायचं शिकवलं नाही,
पण त्यांना बघून
मी जगायला शिकलो.
💐Happy Father’s day.💐

Fathers day images
Fathers day images

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती
असाल पण माझ्यासाठी माझं
संपूर्ण जग आहात 🌷

“बाप” बाप असतो
…तो काही शाप नसतो….
तो आतून कँनव्हास असतो.
.मुलासाठी राब-राब राबतो.
बुडणार्या सुर्याकडे उगाच पाहत बसतो
पायाच्या नखानी माती उकरत असतो.
शेवटी सर्वानीच साथ सोडली असते
पाखरं घर सोडून दुर निघुन गेलेली असतात.
बाप मात्र आपल्या पाखराची वाट पाहतो.💐

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख
म्हणजे बाबा असणं आणि
तुम्ही माझे वडील आहात हे
माझं सर्वात मोठं भाग्य आहे.
🌷Happy Father’s day.🌷

बाबा म्हणजे: मुलाचा पहिला हिरो, मुला-मुलीचे पहिले प्रेम.❤️

Fathers day messages in marathi

आपल्या संकटावर निधड्या
छातीने
मात करणाऱ्या व्यक्तीस
बाप म्हणतात.
❤️Happy Father’s day.❤️

चट्का बसला, ठेच लगली,
फटकासला तर
“आई ग…!”
हा शब्द बाहेर पडतो, पण
रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ
येऊन ब्रेक दाबतो तेव्हा
“बाप रे!”
हाच शब्द बाहेर पडतो.
छोट्या संकटासठी आई
चालते पण मोठ्मोठी वादळ
पेलताना बापच आठवतो.
🌷Happy Father’s day.🌷

पितृ दीन मराठी कविता | Father’s day poems in marathi

कितीही अपयशी झाल्यावरही
विश्वास ठेवणारा पहिला
व्यक्ती असतो
तो म्हणजे बाबा.
💐Happy Father’s day baba.💐

बाबा आज जग मला तुमच्या
नावाने ओळखते हे खरे आहे,
पण मला खात्री आहे,
तुमच्या आशिर्वादाने मी इतके कर्तृत्व करेन,
की एक दिवस हे जग
तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल…
🌻पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.🌻

देवकी यशोदेचं प्रेम जरूर
मनात साठवा
पण भर पावसात टोपलीतून
नेणारा
वासुदेवही आठवा.
🌷हॅप्पी फादर्स डे!🌷

टीप: मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये पितृ दिनाच्या निमित्ताने fathers day wishes in marathi, fathers day quotes in marathi, fathers day sms in marathi, happy fathers day wishes in marathi, fathers day images, banner, photo दिलेले आहेत.

यातील पितृदिनावरील सुंदर संदेश (fathers day quotes in marathi) तुम्ही तुमच्या वडिलांना पाठवून पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकता.

fathers day wishes in marathi या पोस्टमध्ये दिलेले पितृ दिनाच्या शुभेच्छा संदेश तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, धन्यवाद…!


या पोस्टला नक्की शेअर करा 😜

Leave a Comment

x