Blogger blog मध्ये author profile कशी दाखवावी ? | How to show author profile on blogger blog

या पोस्टला नक्की शेअर करा 😜

ब्लॉगर ब्लॉगवर author प्रोफाइल कशी दाखवावी? (How to show author profile on blogger blog marathi) :- नमस्कार मंडळी! स्वागत आहे तुमचं मराठी संग्रह ब्लॉग मध्ये. आजच्या पोस्टमध्ये आपण blogger blog मध्ये author profile कशी दाखवावी ? याबद्दल माहिती घेणार आहोत. आपण आज blogger.com वर तयार केलेल्या ब्लॉगमध्ये author प्रोफाइल लावायला शिकणार आहोत.

Blogger blog मध्ये author profile कशी दाखवावी ? | How to show author profile on blogger blog

मित्रांनो तुम्ही अनेक ब्लॉगमध्ये author profile पाहिली असेल. ज्यामध्ये एका छोट्या बॉक्स मध्ये author म्हणजेच ब्लॉगच्या लेखकबद्दल थोडक्यात माहिती दिलेली असते.

यात blog author चा एक छोटा profile photo असतो आणि त्या खाली ब्लॉगर बद्दल थोडक्यात माहिती असते. जसे की blogger चे नाव, त्याचे शिक्षण किती झाले आहे, त्याची आवडी निवडी , ब्लॉग लिहिण्याचा उद्देश, इत्यादी माहिती दिलेली असते.

यात वाचकाला एखादा संदेश देखील दिलेला असू शकतो किंवा जर त्या ब्लॉग वरील पोस्ट हे एका पेक्ष अधिक लेखकांद्वारे लिहिलेल्या असतील तर त्या author team बद्दल देखील थोडक्यात माहिती असू शकते.

ब्लॉगमध्ये author profile लावणे का आवश्यक असते ?

तुमच्या मनात हा प्रश्न असू शकतो की ब्लॉगमध्ये author profile लावणे अनिवार्य नाही तर मग ब्लॉगमध्ये author profile का लावावी ?

होय, ब्लॉगमध्ये author profile लावणे अनिवार्य नाही म्हणजेच ब्लॉगमध्ये author प्रोफाइल show करायची की नाही हे तुमच्या हातात आहे. याचा तुमच्या ब्लॉगच्या seo वर काहीही फरक पडत नाही.

पण जर ब्लॉगमध्ये author profile लावलेली असेल तर ब्लॉग आणखी user friendly दिसतो. यामुळे तुमच्या वाचकाला तुमच्या वर आणि तुमच्या ब्लॉगवर अधिक विश्वास बसतो. जर वाचकाला blog author ची qualification माहिती असेल तर त्याने लिहिलेली माहिती वाचकाला तेवढीच महत्त्वाची वाटते. म्हणून ब्लॉगमध्ये author प्रोफाइल असणे गरजेचे आहे.

ब्लॉगमध्ये author profile कशी दाखवावी ? ( Step by step instructions to how to show author profile on blogger blog in marathi)

Step १: सर्वात पहले तुम्हाला तुमचा email id आणि password टाकून blogger.com वर log in करायचे आहे. तुम्ही log in करण्यासाठी तोच ईमेल वापरा जो की तुम्ही ब्लॉग तयार करण्यासाठी वापरला आहे.

Step २: आता तुमचा blogger dashboard ओपन होईल.

Step ३: blogger dashboard ओपन झाल्यानंतर त्यात तुम्हाला layout पर्याय शोधायचा आहे. तुम्हाला blogger menu मध्ये खालच्या बाजूला layout पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

ब्लॉगर ब्लॉगमध्ये author profile कशी दाखवावी ?

Step ४: layout मध्ये तुम्हाला तुमच्या theme चा पूर्ण लेआऊट दिसेल. त्यात तुम्हाला अशी जागा शोधायची आहे जिथे की तुम्हाला author profile लावायची आहे

Step ५: आपण यात right sidebar मध्ये म्हणजेच theme च्या उजव्या बाजूला author profile लावणार आहोत. त्यासाठी तुम्हाला layout section मध्ये sidebar पर्याय दिसेल त्यातील “add a gadget” पर्यायावर क्लिक करा.

How to show author profile on blogger blog in marathi

Step ६: आता तुमच्या समोर blogger ने उपलब्ध केलेले सर्व gadgets दिसतील. यातील तुम्हाला author profile हे gadget सिलेक्ट करायचे आहे.

How to show author profile on blogger blog

Step ६: आता save बटन दाबून settings save करायची आहे. अभिनंदन ! तुम्ही यशस्वीरीत्या blogger blog मध्ये author profile लावायला शिकला आहात.

Step ७: तुम्ही blogger menu मधील ‘view blog’ वर क्लिक करून check करू शकता की तुमच्या ब्लॉगमध्ये author profile दिसत आहे की नाही .

तुम्ही काय शिकलात ?

मंडळी या पोस्टमध्ये आपण blogger blog मध्ये author profile कशी लावावी याबद्दल माहिती घेतली. तसेच आपण यात blogger blog मध्ये author profile लावण्याची step by step procedure जाणून घेतली.

मला अशा आहे की तुम्हाला blogger blog मध्ये author profile कशी लावावी ही माहिती नक्कीच आवडली असेल. तुम्ही जर मराठी संग्रह ब्लॉगला subscribe केले नसेल तर बाजूला असलेली घंटा दाबून ब्लॉगला subscribe Karun घ्या. कारण या ब्लॉगमध्ये तुम्हाला blogger आणि wordpress चे सर्व tutorials शिकायला मिळणार आहेत, धन्यवाद…!!!


या पोस्टला नक्की शेअर करा 😜

1 thought on “Blogger blog मध्ये author profile कशी दाखवावी ? | How to show author profile on blogger blog”

Leave a Comment

x