ब्लॉगर वर फ्री ब्लॉग कसा तयार करावा ? | Blogger var free blog kasa tayar karava

या पोस्टला नक्की शेअर करा 😜

Blogger var free blog kasa tayar karava – जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पैसे कमावण्याचा विचार करत असाल व त्याच्या संबंधात इंटरनेट वर माहिती शोधत असाल तर तुम्हाला बहुतेक ठिकाणी ब्लॉगिंग बद्दल नक्कीच माहिती मिळाली असेल. कारण आज ब्लॉगिंग एक ऑनलाईन पद्धतीने पैसे कमावण्याचा उत्तम पर्याय ठरत आहे.

आज कित्येक लोक ब्लॉगिंग ला करिअर च्या स्वरूपात पाहत आहेत. ब्लॉगिंग मधून पैसे कमावणे खूप सोपं देखील आहे आणि ते काम करणं फार मजेशीर देखील आहे.

तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पैसे कसे कमवावे याबाबत गूगल वर सर्च केले असता तुम्हाला अनेक results मिळाले असतील. हे सर्व results गूगल ने तुम्हाला blog आणि website च्याच स्वरूपात दाखवले आहेत. तुम्ही जी पण माहिती गूगल वर सर्च करता ती सर्व माहिती एखाद्या ब्लॉगमध्ये समाविष्ट केलेली असते.

आजच्या या पोस्टमध्ये आपण blogger var free blog kasa banvava शिकणार आहोत तसेच आपण blogger.com वर account देखील तयार करायला शिकणार आहोत.

Blog म्हणजे काय? (What is blog in Marathi)

Blog म्हणजे एक प्रकारची website च असते ज्यामध्ये एखाद्या विशिष्ट topic बद्दल माहिती समाविष्ट केलेली असते. ही माहिती आपल्याला इंटरनेट वर keyword search केल्यानंतर मिळते.

उदाहरणात तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये ” ब्लॉगर वर ब्लॉग कसा तयार करावा ” याबद्दल माहिती दिली आहे आणि हा keyword जर तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये टार्गेट केला असेल. तर जेंव्हा एखादा युजर हा keyword गूगल वर सर्च करेल तेंव्हा त्याला गूगल search results मध्ये तुमची पोस्ट दाखवेल. अशा प्रकारे ब्लॉगिंग मधून माहिती, ज्ञान अगदी सहजपणे जगातील लोकांपर्यंत पोहचवता येते.

ब्लॉगिंग मधून आपण माहिती, ज्ञान लोकांपर्यंत पोहचवू शकतो. स्वताला व्यक्त करण्याचं ब्लॉगिंग हे एक उत्तम व्यासपीठ आहे. तसेच यातून तुम्ही लाखों रुपये देखील कमावू शकता.

आज घडीला असे अनेक ब्लॉगर आहेत ज्यांनी की ब्लॉगिंग ला full time करत आहेत आणि त्यापासून महिण्यकाठी लाखों रुपयांचा revenue मिळवत आहेत.

ब्लॉगिंग बद्दल पूर्ण माहिती मिळवण्यासाठी तुम्ही या लिंक वर क्लिक करा. या पोस्टमध्ये मी अगोदरच ब्लॉगिंग ची पूर्ण माहिती सविस्तर दिलेली आहे.

Blogger.com वर अकाउंट कसे तयार करावे ?

Blog सुरू करण्यापूर्वी तुम्हाला blogger.com वर account तयार करावे लागेल. Blogger हे एक गूगलचे प्रॉडक्ट आहे त्यामुळे यावर आपण free blog तयार करू शकतो. यावर आपल्याला गुगलची मोफत hosting मिळते आणि blogspot.com नावाचे subdomain देखील मोफत मिळते.

Step १: सर्वप्रथम तुम्हाला कोणतेही एक web browser ओपन करायचे आहे जसे की chrome browser, opera browser, UC mini, इत्यादी.

Step २: त्यानंतर तुम्हाला त्यात blogger.com सर्च करायचे आहे.

Step ३: आता तुम्हाला blogger च्या official website ला भेट द्यायची आहे.

Step ४: blogger.com ओपन केल्यानंतर तुमच्या समोर एक ब्लॉगर चा interface येईल. त्यात वरच्या उजव्या बाजूला sign in चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

Step ५: आता तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून blogger.com वर sign in करून घ्यायचे आहे.

Step ६: अभिनंदन ! तुम्ही blogger.com वर यशस्वीरीत्या account तयार केले आहे. आता तुम्ही यात ब्लॉग सुरु करू शकता.

चला मग पाहूया blogger var free blog kasa tayar karava…

Blogger वर ब्लॉग कसा तयार करावा (how to create free blog on blogger)

Blogger.com वर account तयार केल्यानंतर आता तुम्हाला त्यात एक फ्री ब्लॉग तयार करायचा आहे. ब्लॉगर वर मोफत ब्लॉग तयार करता येईल कारण येथे तुम्हाला गूगल कडून मोफत hosting आणि subdomain मिळते.

Blogger var free blog kasa tayar karava

ब्लॉग तयार करण्यासाठी इंटरनेट वर अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. पण त्यात blogger आणि wordpress सर्वाधिक प्रचलित आहेत.

तुम्हाला blogger आणि wordpress यातील एकाची निवड करण्यात अडचणी येत असतील तर त्यासाठी मी अगोदरच blogger vs WordPress हा लेख लिहिला आहे . ज्यात मी Blogger आणि wordpress ची काही पैलुंच्या आधारे तुलना केली आहे. यातून तुम्हाला नक्कीच समजून येईल की तुमच्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म उत्तम आहे.

Blogger वर फ्री ब्लॉग तयार करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा :

Step १: सर्वप्रथम blogger.com साईट ला visit करा.

Step २: blogger वर जर तुम्ही account तयार केलेले नसेल तर अगोदर blogger.com वर तुमच्या email id ने account तयार करून घ्या. ब्लॉगर वर अकाउंट कसे तयार करावे याबद्दल पूर्ण माहिती वरती दिलेली आहे.

Step ३: त्यानंतर तुम्हाला “create a new blog” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

Blogger vr free blog kasa tayar karava

Step ४: आता तुमच्या समोर तीन पर्याय येतील blog name, blog address आणि theme. यामध्ये तुम्हाला तुमच्या ब्लॉगच्या संबंधित माहिती भरायची आहे.

ब्लॉगर वर ब्लॉग कसा तयार करावा

Blog name: येथे तुम्हाला तुमच्या ब्लॉगचे नाव द्यायचे आहे जसे या ब्लॉगचे नाव ” मराठी संग्रह ” आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला देखील तुमच्या ब्लॉगला एक नाव द्यायचे आहे.

Blog address : यात तुम्हाला तुमच्या ब्लॉगचा blog address द्यायचा आहे. हा तयार करताना तुम्हाला विशेष लक्ष द्यावे लागेल कारण हाच blog address तुमच्या ब्लॉगचा url असेल. याच्या मदतीने लोक तुमच्या ब्लॉगला भेट देऊ शकतील.

तुम्ही समाविष्ट केलेला blog address जर उपलब्ध असेल “this blog address is available” म्हणून येईल. जर ब्लॉग address इतर कुणी घेतलेला असेल तर “this blog address is not available” म्हणून येईल. म्हणजे तुम्हाला दुसरा blog address ठेवावा लागेल.

Theme: यात तुम्हाला तुमच्या blog साठी एक theme पसंद करायची आहे. यात तुम्हाला गूगल कडून अनेक फ्री theme मिळतील त्यातील एक तुम्हाला निवडायची आहे.

Step ५: नंतर तुम्हाला next वर क्लिक करायचे आहे.

Step ६: अभिनंदन ! तुम्ही यशस्वीरीत्या blogger. com वर फ्री ब्लॉग तयार करायला शिकला आहात.

ब्लॉग कसा लिहावा ?

ब्लॉग तयार केल्यानंतर तुम्हाला आता त्यात नियमित पोस्ट लिहायच्या आहेत. तुमच्या ब्लॉगचा जो topic आहे त्यानुसार तुम्हाला ब्लॉगमध्ये माहिती समाविष्ट करायची आहे. जर तुमचा ब्लॉग health बद्दल असेल तर तुम्हाला सर्व पोस्ट health संबंधितच लिहायच्या आहेत. जेणेकरून तुम्हाला त्या विषयाशी संबंधित माहिती शोधणारा userbase मिळेल आणि सीपीसी पण छान मिळेल.

नवीन पोस्ट लिहिण्यासाठी तुम्हाला “new post” वर क्लिक करायचे आहे. येथून तुम्ही प्रत्येक नवीन पोस्ट लिहू शकता आणि तुमच्या ब्लॉगमध्ये publish karu शकता.

ब्लॉग कसा सुरू करावा ?

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये तुम्हाला blogger var free blog kasa tayar karava याबद्दल सविस्तर माहिती मिळाली असेल. यात मी तुम्हाला blogger.com वर ब्लॉग कसा तयार करावा याबद्दल माहिती दिली. तसेच blogger.com वर account कसे तयार करावे देखील सांगितले.

मित्रांनो ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल अशी माझी आशा आहे. तसेच या पोस्ट मध्ये तुम्हाला blogger var free blog kasa tayar karava याबद्दल पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर सोशल मीडियावर नक्की शेअर करा


या पोस्टला नक्की शेअर करा 😜

Leave a Comment

x