स्प्लैश स्क्रीन म्हणजे काय आणि splash screen चा उपयोग काय असतो ?

या पोस्टला नक्की शेअर करा 😜

Splash screen म्हणजे काय (what is splash screen in marathi) : splash screen चा कोणतेही ॲप किंवा वेबसाईट मध्ये वेगळेच महत्व असते. जर ॲप किंवा वेबसाईट मध्ये splash स्क्रीनचा वापर केलेला नसेल तर ते वापरकर्त्याला उत्तम प्रतिसाद आणि युजर इंटर्फेस देऊच शकत नाही.

जर तुम्ही splash screen म्हणजे काय (splash screen in marathi) याच शोधात इतपर्यंत आला असाल तर तुम्ही एकदम बरोबर ठिकाणी आहात. या पोस्टमध्ये तुम्हाला splash screen म्हणजे काय (what is splash screen in marathi) आणि त्याचा काय उपयोग असतो ? याबद्दल सविस्तर माहिती मिळणार आहे. त्यामुळे पोस्टला शेवटपर्यंत वाचा.

Splash screen म्हणजे काय (what is splash screen in marathi)

Splash स्क्रीन ही कोणत्याही app, game, software किंवा website मधील प्राथमिक स्क्रीन असते. Splash स्क्रीन लाच boot screen किंवा loading screen असेही म्हटले जाते.

जेन्हा तुम्ही एखादे ॲप किंवा गेम ओपन करता तेंव्हा ॲप किंवा गेम सुरू होण्यापूर्वी एक स्क्रीन दिसते तिलाच splash screen असे म्हटले जाते. या splash स्क्रीन मध्ये त्या ॲप्लिकेशन किंवा गेम शी निगडित एखादा लोगो, इमेज, किंवा वॉटरमार्क असू शकतो.

आजकाल तयार होणाऱ्या प्रत्येक ॲप आणि गेम मध्ये या splash screen चा वापर करण्यात येत आहे. Splash स्क्रीन वापरणे खूप महत्वाचे देखील ठरत आहे. यामुळे युजर परेशान न होता त्याला एक उत्तम उत्तम युजर इंटरफेस प्रधान होतो.

Splash स्क्रीनचा जास्तीत जास्त वापर अशा गेम किंवा ॲप मध्ये केला जातो ज्यांचा की लोडींग टाइम खूप जास्त असतो. उदाहरणात तुम्ही मोबाईलवर pubg किंवा free fire सारखे high graphics game खेळत असाल तर तुमच्या लक्षात आले असेल की हे गेम सुरू होण्यापूर्वी एक splash स्क्रीन दाखवली जाते. ज्यात तुम्हाला game च्या प्रोग्रेस बद्दल माहिती मिळते. म्हणजेच गेम किती load झाला आहे किंवा गेम सुरू होण्यासाठी आणखी किती वेळ लागेल याबद्दल माहिती मिळते.

अशा प्रकारचा splash screen interface वापरल्यामुळे युजरला परेशानी होत नाही शिवाय त्याला गेमच्या लोडिंग स्पीड बद्दल देखील माहिती मिळते.

Splash screen चा काय उपयोग असतो ?

आज इंटरनेट आणि टेक्नॉलॉजी च्या दुनियेत स्वतःचे काम सोपे आणि सहज करण्यासाठी किंवा मनोरंजन म्हणून अनेक ॲप आणि गेम use करत असतो. तुम्ही देखील ॲप वापरताना किंवा गेम खेळत असताना कित्येक वेळा splash स्क्रीन पहिली असेल परंतु तुम्हाला त्याबद्दल निश्चित माहिती नसेल की यालाच splash screen असे म्हणतात.

Splash screen ला boot screen किंवा loading screen देखील म्हणतात. असे म्हणण्याचे कारण म्हणजे अनेक ॲप आणि गेम मध्ये या splash स्क्रीनवर ॲप किंवा गेमची loading speed दाखवली जाते.

ॲप किंवा गेम मध्ये splash स्क्रीन असणे खुप महत्वाचे असते. कारण कित्येक वेळा कमी नेटवर्क मुळे ॲप किंवा गेम सुरू व्हायला थोडा वेळ लागू शकतो. अशा वेळी जर स्क्रीनवर काहीच प्रदर्शित झाले नाही किंवा स्क्रीन ब्लँक राहिली तर युजर प्रतिसाद न मिळाल्याने तो ॲप किंवा गेम बंद करू शकतो.

पण अशा वेळेस जर त्या ॲप किंवा गेम मध्ये splash screen असेल तर युजरला देखील लक्षात येईल की हे ॲप व्यवस्थित काम करत आहे. शिवाय त्याला स्क्रीनवर ॲपची loading speed दिसत असल्याने त्याच्या लक्षात येईल की ॲप किंवा गेम ओपन व्हायला किती वेळ लागेल. युजर ॲप, गेम पूर्ण load होईपर्यंत वाट पाहू शकतो.

त्यामुळे आजकाल तयार होणाऱ्या प्रत्येक ॲप आणि गेम मध्ये developer आणि programmer splash स्क्रीन feature देत आहेत. वेबसाईट मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर splash screen चा वापर होताना दिसत आहे.

Android splash screen म्हणजे काय ? (Splash screen meaning in marathi)

Android मोबाईल म्हणजेच स्मार्टफोन मध्ये game, apps, websites वापरत असताना सर्वात पहिल्यांदा जो इन्टर्फेस किंवा स्क्रीन युजरला पडद्यावर दिसते तिला android splash स्क्रीन असे म्हटले जाते. या splash स्क्रीन मध्ये ॲप किंवा गेम चा लोगो, favicon, image किंवा watermark असतो.

Splash स्क्रीनचा वेळ किती असायला हवा ?

होय, हे नक्कीच बरोबर आहे की splash स्क्रीन लावल्याने युजरला उत्तम युजर फ्रेंडली इन्टरफेस मिळतो, त्याला loading स्पीड बद्दल माहिती मिळते. पण जर splash स्क्रीनचा टाइम जास्त वेळ असेल तर हीच splash स्क्रीन युजर त्रासदायक वाटू शकते. त्यामुळे splash स्क्रीनचा कमीत कमी वेळ असायला हवा, splash स्क्रीन अगदी कमी वेळासाठी स्क्रीनवर प्रदर्शित व्हायला हवी.

Splash स्क्रीनचा सरासरी वेळ हा ३-४ सेकंद असतो. हाई ग्राफिक्स गेम आणि ॲपसाठी हाच टाइम ८-१० सेकंद असू शकतो. पण जर splash स्क्रीनचा टाइम १० सेकंद पेक्षा जास्त असेल तर यूजरसाठी नकोसा होतो. त्यामुळे splash स्क्रीनचा प्रदर्शन वेळ खुप कमी असायला हवा.

निष्कर्ष :

मंडळी आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला splash screen म्हणजे काय (splash screen in marathi) आणि त्याचा काय उपयोग असतो ? याबद्दल सविस्तर माहिती दिली. मला अशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल.

Splash स्क्रीन म्हणजे काय (splash screen meaning in marathi) हा लेख तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्हाला splash screen बाबत काही शंका असतील तर कमेंट मध्ये विचारू शकता, धन्यवाद…!


या पोस्टला नक्की शेअर करा 😜

Leave a Comment

x