Swift code म्हणजे काय ? (What is swift code in marathi)

या पोस्टला नक्की शेअर करा 😜

Swift code म्हणजे काय ( what is swift code in marathi ) :- नमस्कार मंडळी ! तुम्ही एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे नक्कीच transfer केले असतील. अशा वेळेस तुम्हाला पैसे एका बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात जमा करण्यासाठी काही कोड ची आवश्यकता असते जसे की IFSC code , swift code. हे कोड टाकल्याशिवाय तुमचे पैसे बँक खात्यात जमाच होत नाहीत, त्यामुळे हे कोड बँक मध्ये पैसे जमा करण्याच्या फॉर्मवर टाकणं फार गरजेचे असते.

पण बहुतेक वेळी आपल्याला swift कोड म्हणजे काय (what is swift code in marathi) किंवा IFSC code म्हणजे काय ? याबद्दल माहिती नसते. शिवाय प्रत्येक बँकेचे swift कोड आणि IFSC कोड सारखे नसतात. त्यामुळे हे कोड कुठून मिळवायचे हा देखील एक प्रश्न आपल्या समोर असतो.

मित्रांनो चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला swift code म्हणजे काय ( what is swift code in marathi ) बद्दल पूर्ण माहिती देणार आहे. तसेच या पोस्टमध्ये मी तुम्हाला कोणत्याही बँकेचा swift code कसा मिळवावा याबद्दल देखील सांगणार आहे.

Swift code म्हणजे काय ( what is swift code in marathi )

मित्रांनो तुम्ही बँक खात्यातून पैसे transfer करते वेळेस IFSC कोड बऱ्याच वेळेस वापरला असेल आणि बहुदा तुम्हाला त्याबद्दल माहिती देखील असेल. परंतु swift code हा तुमच्यासाठी नक्कीच नवीन असू शकतो किंवा तुम्हाला आजपर्यंत त्याची आवश्यकता देखील भासली नसेल.

Swift कोड हा एक असा कोड असतो जो की international banking साठी वापरला जातो. ज्याप्रमाणे आपण आपल्या देशातील बँकेत पैसे transfer करण्यासाठी IFSC code वापरतो त्याचप्रमाणे बाहेर देशातील बँकेत पैसे transfer करण्यासाठी हा swift code वापरला जातो.

खुप लोकांना असे वाटते की आयएफएससी कोड आणि स्विफ्ट कोड हे एकच आहेत. परंतु तसे नसून दोन्ही कोड मध्ये खूप फरक आहे. ज्यावेळेस आपल्याला आपल्या देशातील राष्ट्रीय किंवा मग स्थानिक बँक सोबत व्यवहार करायचा असतो त्यावेळेस IFSC कोड वापरला जातो तर जेंव्हा आपल्याला व्यवहार आंतर्राष्ट्रीय बँक सोबत करायचा असतो त्यावेळेस swift code उपयोगी पडतो. त्यामुळे तुम्हाला swift code म्हणजे काय माहिती असणे गरजेचे आहे.

Swift कोड हा ८ ते ११ अंकाचा असतो. यामध्ये अंक, इंग्रजी अक्षरे व काही चिन्हांचा देखील समावेश असतो. या स्विफ्ट कोड मध्ये bank ची मूलभूत माहिती असते. यामध्ये बँकेचे नाव, बँक चे लोकेशन म्हणजे बँक कोणत्या देशात आहे, बँक ची ब्रांच, इत्यादी बद्दल माहिती असते.

या कोड च्या मदतीने बँकेला आपल्याला ज्या बँकेत पैसे पाठवायचे आहेत त्याबद्दल पूर्ण आवश्यक माहिती मिळते आणि आपले पैसे देखील सुरक्षितपणे त्या बँकेत ट्रान्स्फर होतात.

Swift code ची गरज कुणाला असते ?

Swift कोड ची आवश्यकता खास करून त्या लोकांसाठी असते जे की इंटरनॅशनल बँकेसोबत transiction करत असतात. बाहेर देशातील बँकेत पैसे पाठवणे व बाहेर देशातील बॅंकेतून पैसे मिळवणे यासाठी हा swift code उपयुक्त असतो.

या कोड ची गरज ऑनलाईन पद्धतीने पैसे कमावणाऱ्या व्यक्तींना जास्त असते. जसे की blogger, youtuber, freelancer, इत्यादी लोकांचे व्यवहार नेहमी आंतरराष्ट्रीय बंकेसोबत असतात. कारण त्यांना google adsense कडून पैसे येत असतात.

तुम्ही देखील google adsense किंवा मग freelancing द्वारे पैसे कमावत आहात किंवा मग भविष्यात कमावणार असाल तर तुम्हाला देखील swift code बद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

कोणत्याही बँकेचा swift code कसा मिळवावा ?

जवळपास सर्वच बँकेचे swift code असतात पण काही अशा बँक देखील आहेत ज्यांचे की swift code नाहीत. मग अशा बॅंकेतून आंतरराष्ट्रीय व्यवहार कसे करावे ?

स्थानिक बँक ज्या की आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यवहार स्वीकारत नाहीत, ज्या बॅंकेतून आंतरराष्ट्रीय लेन देणं होत नाही बहुदा अश्याच बँकेचे swift कोड (what is swift code in marathi ) नसतात आणि अशा बँकांना स्विफ्ट कोड ची आवश्यकता देखील नसते कारण त्या बँक केवळ स्थानिक व राष्ट्रीय पातळीवरील व्यवहार करतात.

मग ज्या बँकेचे swift कोड आहेत ते कसे मिळवावे ?

तुम्ही खालील दोन पद्धतीने कोणत्याही बँकेचे swift code मिळवू शकता :

पहिली पद्धत : बँकेला प्रत्यक्ष भेट देऊन

तुम्हाला जर एखाद्या बँकेचा swift code जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही त्या बँकेला प्रत्येक्षात भेटून तो मिळवू शकता किंवा त्याबद्दल बँकेकडून माहिती मिळवू शकता. हा पर्याय सर्वात सोपा आहे. येथून तुम्हाला तुमच्या बँकेचा swift कोड देखील मिळेल आणि international transaction साठी आवश्यक सर्व माहिती देखील बँक कर्मचाऱ्यांकडून मिळू शकते.

दुसरी पद्धत : वेबसाईट च्या मदतीने 

जर तुम्हाला त्वरित swift code ची आवश्यकता असेल आणि तुम्हाला बँकेला भेट देन्यात काही अडचणी असतील तर तुम्ही या पद्धतीने अतिशय लवकर तुमच्या बँकेचा swift कोड मिळवू शकता. यासाठी तुमच्याकडे स्मार्ट फोन असणे गरजेचे आहे.

तुमच्या बँकेचा swift कोड मिळवण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटला भेट द्यायची आहे. त्यानंतर तिथे विचारली जाणारी bank details द्यायची आहे. तुम्हाला लगेच तुमच्या बँकेचा स्विफ्ट कोड मिळून जाईल.

Swift code लगेच मिळवण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा :

स्टेप १: सर्वात पहिले तुम्हाला खालील दिलेल्या ” swift कोड मिळवा” लिंकवर क्लिक करायचे आहे.

Swift code मिळवण्यासाठी येथे क्लिक करा >> swift कोड मिळवा

स्टेप २: त्यानंतर तुम्हाला काही बँकेची माहिती येथे द्यायची आहे जसे की :

 1. बँकेचे नाव (bank name)
 2. राज्य (state)
 3. शहर (city)
 4. ब्रांचं नाव ( branch name )

What is swift code in marathi

स्टेप ३: तयानंतर तुम्हाला सबमिट वर क्लिक करायचे आहे.

स्टेप ४: तुमच्या समोर तुमच्या बँकेचा swift code मिळेल. तसेच येथून तुम्हाला बँकेची इतर माहिती देखील मिळते जसे की बँकेचा ifsc कोड, बँकेचा पत्ता, बँकेचा contact नंबर आणि ईमेल, branch कोड, इत्यादी.

What is swift code in marathi

येथून तुम्हाला swift कोड बरोबरच बँकेची आणखी काही माहिती मिळेल. जसे की –

 1. बँकेचे नाव (bank name)
 2. आयएफआयएससी कोड (ifsc code)
 3. ब्राचं नाव (branch name)
 4. MICR number
 5. Branch code
 6. Swift code
 7. पिनकोड (pincode)
 8. बँकेचा पत्ता (bank address)
 9. Bank district
 10. Bank state
 11. Contact number
 12. Email id
 13. Customer care number

Swift code full form काय आहे ?

Swift code चा फुल फॉर्म आहे ” Society for worldwide interbank financial telecommunications “. या कोडला इतर काही नावाने देखील ओळखले जाते जसे की swift code, swift BIC, swift id, ISO 9362, इत्यादी.

त्यामुळे यापैकी एखादे नाव वापरले गेले तर तुमचे confusion होऊ नये. कारण अनेक बँक च्या परीक्षेत swift कोड ला यापैकी एखाद्या नावाने संबोधले जाऊ शकते.

निष्कर्ष : swift कोड म्हणजे काय ?

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला swift code म्हणजे काय (what is swift code in marathi) बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. तसेच या पोस्त्मधून मी तुम्हाला कोणत्याही बँकेचा swift code कसा मिळवावा याबद्दल देखील सांगितले आहे.

मित्रांनो आपल्याला बँकेत व्यवहार करताना swift कोड, ifsc कोड सारख्या कोड ची नेहमी आवश्यकता असते त्यामुळे swift कोड म्हणजे काय (what is swift code in marathi) याबद्दल तुम्हाला माहिती मिळावी म्हणून ही पोस्ट लिहिली आहे.

तुम्हाला swift code information in marathi ही पोस्ट नक्कीच आवडली असेल आणि तुम्हाला यातून नक्कीच काहीतरी उपयुक्त माहिती वाचण्यासाठी मिळाली असेल. तर मित्रांनो नवनवीन उपयुक्त माहिती पर लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट देत रहा, धन्यवाद…!


या पोस्टला नक्की शेअर करा 😜

Leave a Comment

x