(2 ways) favicon kasa tayar karava

या पोस्टला नक्की शेअर करा 😜

favicon kasa tayar karava – नमस्कार मंडळी! आपण आजच्या या लेख मध्ये ब्लॉग साठी favicon बनवायला शिकणार आहोत कारण या पूर्वी आपण माहिती घेतली होती की फविकॉन म्हणजे काय आणि ब्लॉग मध्ये favicon कसा लावावा.

जर तुम्हाला favicon काय असतो माहिती नाही तर आधी तुम्ही वरील लिंकवर क्लिक करून तो लेख वाचा त्यानंतर तुम्ही favicon kasa tayar karava हा लेख वाचू शकता. मी या अगोदरच्या पोस्ट मध्ये ब्लॉग मध्ये फविकॉन लावायला शिकवला.

परंतु असे अनेक लोक आहेत ज्यांना की योग्य आणि सोप्या पद्धतीने favicon बनवता येत नाही त्यामुळे मी हा आज लेख लिहिला आहे.तर चला मग शिकूया अगदी सोप्या पद्धतीने favicon कसा तयार करावा?

Favicon kasa tayar karava ?

मित्रानो favicon तयार करण्यासाठी गूगल वर अनेक साईट उपलब्ध आहेत आज आपण त्यातील एका साईट चा वापर करणार आहोत त्या साईट च नाव आहे favicon.io

यामध्ये आपण दोन पद्धतीने favicon तयार करायला शिकणार आहोत.

  1. Text पासून favicon कसा तयार करावा
  2. Image/png पासून favicon कसा तयार करावा

गूगल वर favicon तयार करण्यासाठी अनेक साईट आहेत पण ही साईट निवडण्याचा कारण एवढंच की येथे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आणि अतिशय कमी वेळात उत्कृष्ट favicon तयार करू शकता. येथे तुम्हाला favicon च तुमच्या मणानुसार customization करता येत.

येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार favicon चा रंग निवडू शकता, आवडीचा text font वापरू शकता आणि विशेष म्हणजे favicon ची size देखील ठरवू शकता. तर चला मग शिकूया favicon kasa tayar karava…

Text पासून favicon kasa tayar karava.

स्टेप १: सर्वात पहले तुम्हाला favicon.io वेबसाईट ला भेट द्यायची आहे जिथे आपण एक आकर्षक favicon तयार करणार आहोत.

स्टेप २: आता तुमच्या समोर काही पर्याय दिसतील जसे text to ico, png to ico आणि img to ico यातील तुम्हाला text to ico वर क्लिक करायचे आहे कारण आपण आता text पासून favicon बनवत आहोत.

स्टेप ३: त्यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म येईल जिथे तुम्हाला तुमचा favicon कसा हवाय याबद्दल माहिती द्यायची आहे. जसे खाली दिल्या प्रमाणे

  • Text: तुम्हाला ज्या text पासून favicon बनवायचा आहे तो text तुम्हाला इथे लिहायचा आहे
  • Background: येथून तुम्ही favicon साठी बॅकग्राऊंड निवडू शकता जसे की rounded, squre
  • Font family: इथे तुम्हाला तुमच्या पसंदिच स्टायलिश टेक्स्ट फॉन्ट निवडायचा आहे
  • Font size: येथे तुम्हाला तुमच्या फॉन्ट ची साईज् निश्चित करायची आहे आपण अशीच साइज निवडा ज्यामध्ये तुमचा टेक्स्ट बॅकग्राऊंड मध्ये एकदम फिट बसेल.

स्टेप ४: यानंतर तुम्हाला आता फॉन्ट आणि बॅकग्राऊंड रंग तुमच्या favicon साठी ठरवायचा आहे

स्टेप ५: आता तुमचा favicon जवळपास तयार झाला आहे आता तुम्ही एकदा त्याला प्रिवियू करून पाहा आणि काही त्यात बदल करायचे असतील तर करून घ्या

स्टेप ६: आता तुमचा favicon पूर्णपणे तयार झाला आहे आता तुम्ही त्याला डाऊनलोड करून घ्या

img/png पासून favicon kasa tayar karava

आता आपण image किंवा png पासून favicon बनवणार आहोत त्यासाठी खालील स्टेप फॉलो करा

स्टेप १: सर्वात पहले favicon.io वेबसाईट ला भेट द्या

स्टेप २: त्यानंतर तुम्हाला png to ico निवडायचा आहे

स्टेप ३: अता तुमच्यासमोर एक फॉर्म येईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा img/png अपलोड करायचा आहे

स्टेप ४: लगेच तुमचा favicon तयार होईल आपण तो डाउनलोड बटण दाबून डाउनलोड करू शकता

ब्लॉग मध्ये favicon कसा लावावा?

मित्रांनो याबद्दल सर्व माहिती मी माझ्या अगोदरच्या पोस्ट मध्ये दिली आहे आणि त्या पोस्ट ची लिंक मी वरती दिली आहे आपण त्या लिंकवर क्लिक करून ती संपूर्ण माहिती वाचू शकता.

Favicon तयार करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम blogger dashboard ओपन करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला layout हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. नंतर त्यात तुम्हाला favicon upload करण्यासाठी एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. येथून तुम्ही तुमच्या आवडीनुसार फोन गॅलरी मधून एखादा favicon तुमच्या ब्लॉगमध्ये upload करू शकता.

ब्लॉगमध्ये favicon लावण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा :

Blogger Dashboard => layout => upload favicon => choose from gallery => upload on blog

निष्कर्ष: favicon kasa tayar karava?

मित्रानो या पोस्ट मध्ये आपण  favicon kasa tayar karava याबद्दल सर्व सविस्तर माहिती घेतली. आता तुम्ही देखील एक सुंदर favicon बनवून तुमच्या ब्लॉग वर लावू शकता.

तुम्हाला आजची माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि माहिती जर आवडली असेल तर खाली काही सोशल मीडिया बटण आहेत ते दाबून आपल्या मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा, धन्यवाद…!!!


या पोस्टला नक्की शेअर करा 😜

Leave a Comment

x