Table of Contents
Barcode म्हणजे काय? ( What is barcode in marathi ) मित्रांनो तुम्ही जर कधी मॉलमध्ये शॉपिंग केली असेल तर तुम्ही प्रत्येक वस्तूंच्या पाठीमागे काळया समांतर रेषा पहिल्या असतील. तुम्हाला या रेशांबद्दल नक्कीच कुतूहल वाटले असेल. या रेषा कश्यासाठी असतात, त्यांचा काय उपयोग असतो यासारखे प्रश्न नक्कीच तुमच्या मनात पडले असतील.
तसेच तुम्ही मॉलमध्ये वस्तूंची खरेदी केल्यावर जेंव्हा बिल घेण्यासाठी काउंटर वर जाता तेंव्हा तेथील व्यक्ती प्रत्येक वस्तुवरील त्या काळया रेषांच्या समोर एक छोटी मशीन नेतो आणि ट्यूंकुन असा आवाज झाला की त्या वस्तूचे बिल कॉम्प्युटरमध्ये save होते. सर्व वस्तू तपासून तो काउंटर वरील व्यक्ती तुम्हाला सर्व वस्तूंचे एकूण बिल देतो.
वस्तूंच्या पाठीमागे असणाऱ्या या काळया समांतर रेषाना barcode असे म्हटले जाते. हे बारकोड वस्तू बाबतची माहिती साठवून ठेवण्यासाठी वापरले जातात. म्हणून आज या पोस्टमध्ये मी तुम्हाला याच बारकोड बद्दल सर्व आवश्यक माहिती देणार आहे जसे की barcode म्हणजे काय? ( What is barcode in marathi), कसा बनवला जातो, त्याचा काय उपयोग आहे, इत्यादी.
Barcode म्हणजे काय? (What is barcode in marathi)
What is barcode in marathi

Barcode एक machine readable code असतो. ज्यामध्ये बायनरी कोडच्या मदतीने माहिती साठवली जाते आणि ही माहिती आपण बारकोड स्कॅंनरच्या मदतीने वाचू शकतो.
यामध्ये पांढर्या पृष्ठभागावर उभ्या समांतर काळया रेषा असतात व त्यासोबतच ० ते ९ अंक असतात. तुम्हाला तर माहीतच असेल की कंप्युटर केवळ बायनरी भाषा समजतो. म्हणजे अशी भाषा जी केवळ ० आणि १ या दोन अंकांपासून तयार झालेली असते.
या बारकोड मध्ये १५ भाग असतात आणि या मध्ये ९५ छोटे छोटे रकाने असतात ज्यामध्ये ० आणि १ यांच्या मदतीने माहिती साठवली जाते. या बारकोड मध्ये वस्तूची किंमत , वस्तूचे प्रमाण, वस्तूचे वजन, वस्तू निर्मिती दिनांक, वस्तूचा समाप्ती दिनांक, इत्यादी माहिती साठवलेली असते. तसेच यामध्ये वस्तू बाबत एखादी सूचना देखील दिलेली असू शकते.
तुम्ही साबण, तेल, पावडर यांसारख्या दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या वस्तूवर देखील या उभ्या काळया समांतर रेषा पहिल्या असतील ज्यांना की barcode असे म्हटले जाते. बारकोड वरील ही माहिती आपण बारकोड स्कॅनर च्या मदतीने मिळवू शकतो.
Barcode चा उपयोग कश्यासाठी केला जातो? (Uses of barcode)
तुम्हाला बारकोड काय असतो समजले असेल आता आपण जाणून घेऊया त्यांचा उपयोग कश्यासाठी केला जातो.
बारकोड हे आजच्या ऑनलाईन व तंत्रज्ञान युक्त व्यवहारामध्ये फार मोलाचे कार्य बजावत आहेत. आज जवळपास सर्वच manufacturing कंपन्यांमध्ये या बरकोडीचा वापर होताना दिसत आहे.
What is barcode in marathi

बारकोडचा वापर हा मुख्यतः वस्तूची किंमत, वजन, मात्रा, वस्तू निर्मिती दिनांक, वस्तू समाप्ती दिनांक, इत्यादी माहिती ग्राहकाला देण्यासाठी केला जातो. तसेच या बरकोडच्या साह्याने प्रॉडक्टला ट्रॅक करण्यासाठी देखील केला जातो.
यामुळे कंपनीला प्रोडक्टची निर्मिती व त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी मदत होते.
Barcode चे प्रकार ( types of barcodes in marathi )
बारकोड चे मुख्य दोन प्रकार पडतात:
- १ dimensional barcode
- २ dimensional barcode
१d barcode Vs २d barcode
- १ dimensional बारकोड ला linear dimensional किंवा १d dimensional असे देखील म्हटले जाते.
- २ dimensional बारकोड ला २d barcode किंवा मग QR कोड ( Quick response code ) असे देखील म्हटले जाते
- १d हा बारकोड मुख्यतः साबण, तेल, पावडर यांसारख्या सामान्य वस्तूवर असतो
- १d बारकोड मध्ये २d पेक्षा माहिती साठवन्याची क्षमता कमी असते.
- बारकोड जर व्यवस्थित दिसत नसेल किंवा त्यात तूट – फूट झाली असेल तरी २d बारकोड हा स्कॅन होतो पण १d बारकोड स्कॅन करण्यासाठी तो व्यवस्थित असायला हवा त्यात तूट फूट असेल तर स्कॅन होत नाही.
- १d बारकोड मध्ये मुख्यतः text च्या स्वरूपात माहिती साठवली जाते तर २d बारकोड मध्ये text, audio, video, website, app यांच्या मदतीने देखील माहिती साठवता येते.
- आज २d बारकोड मध्ये फार मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. त्याची योग्यता व माहिती साठवण्यची क्षमता देखील पूर्वीपेक्षा वाढली आहे. त्यामुळे कित्येक व्यावसायिकांना बारकोड चा वापर करून व्यवसायात चांगलाच फायदा झाला आहे.
Barcode कसा काम करतो ?
बारकोड ला barcode scanner च्या मदतीने स्कॅन केले जाते. बारकोड स्कॅनर बारकोड ला स्कॅन करून त्यातील माहिती सिस्टम मध्ये स्टोअर करतो आणि युजरला दाखवतो.
बारकोड ला लेझर बारकोड स्कॅनर च्या मदतीने स्कॅन केले असता बारकोड मध्ये ज्या ठिकाणी लाल लाईट लागते त्या ठिकाणी ० गृहीत धरले जाते व जिथे कोणतीच लाईट लागतं नाही त्या ठिकाणी १ असे गृहीत धरले जाते.
नंतर ० आणि १ यांच्या संबंधातून स्कॅनर आपल्याला प्रमाण माहिती दाखवतो. अशा प्रकारे बारकोड कार्य करतो.
Barcode कसा स्कॅन करावा?
बारकोड स्कॅन करणं किंवा त्यातील माहिती मिळवणं आज खूप सोपं झालं आहे. पूर्वी बारकोड ला स्कॅन करण्यासाठी एका विशिष्ट बारकोड स्कॅनर ची आवश्यकता लागायची. पण आज बारकोड स्कॅन करणं खूप सोपं झालं आहे.

तुम्ही अगदी तुमच्या android, apple, mac कोणत्याही मोबाईलवर देखील सहजपणे बारकोड ला स्कॅन करू शकता. यासाठी अनेक बारकोड स्कॅनर ऍप्लिकेशन उपलब्ध आहेत .
Barcode कसा तयार करावा ?
तुम्ही ही बारकोड बद्दल माहिती वाचताय म्हणजे निश्चितच तुम्हाला बारकोड ची आवश्यकता असेल. तुम्ही जर एखादा व्यवसाय करत असाल तर तुमचा स्वतःचा बारकोड असणं देखील फार महत्वाचं आहे. कारण आज तुम्ही पाहत असाल की प्रत्येक प्रॉडक्ट वर त्या कंपनीचा बारकोड आहे.
यामुळे कंपन्यांना त्यांच्या उत्पन्नात अमुलाग्र बदल जाणवला आहे. म्हणून आज जवळपास प्रत्येक कंपनीकडे बारकोड असतो. शिवाय ग्राहक देखील बारकोड असणारे प्रॉडक्ट विकत घ्यायला प्रोत्साहित असतात.
तुम्ही देखील तुमच्या buissness साठी अगदी सोप्या पद्धतीने बारकोड तयार करू शकता. यातून तुम्हाला तुमचे प्रॉडक्ट ट्रॅक करण्यासाठी देखील मदत मिळेल.
मी खाली काही online barcode generator tools ची लिंक देत आहे. येथून तुम्ही सहज बारकोड तयार करू शकता.
निष्कर्ष:
मित्रानो आजच्या पोस्टमध्ये आपण बारकोड बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली जसे की बारकोड म्हणजे काय (What is barcode in marathi), कसा तयार करावा, कसा स्कॅन करावा, इत्यादी
मी तुम्हाला barcode म्हणजे काय याबद्दल सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला ही माहिती नक्कीच समजली असेल. तुम्हाला बारकोड बद्दल काही शंका असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नांना नक्कीच उत्तर देईल.
ही माहिती तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याशी सोशल मीडियावर शेअर करा जेणकरून त्यांनाही barcode म्हणजे काय ( what is barcode in marathi ) याबद्दल सविस्तर माहिती मिळेल, धन्यवाद…!!!