Blogger dashboard in marathi – ब्लॉगर डॅशबोर्ड ची पूर्ण माहिती

या पोस्टला नक्की शेअर करा 😜

नमस्कार मित्रांनो! आजच्या पोस्टमध्ये आपण blogger dashboard बद्दल संपूर्ण माहिती blogger dashboard in marathi जाणून घेणार आहोत.

जसे की blogger dashboard म्हणजे काय? ब्लॉगर डॅशबोर्ड मधील सर्व टूल ची माहिती आणि त्यांचा उपयोग.

Blogger dashboard information in marathi

मित्रांनो ब्लॉगर वर ब्लॉग सुरू केल्यानंतर आपल्याला त्या ब्लॉग मध्ये आपल्या ब्लॉगच्या विषयानुसार नियमित पोस्ट लिहायच्या असतात. उदाहरणात जर तुमचा ब्लॉगचा टॉपिक तंत्रज्ञान असेल तर तुम्हाला सर्व पोस्ट त्या विषयाशी संबंधित लिहायच्या असतात.

जर तुम्ही ब्लॉगिंग मध्ये नवीन असाल आणि नुकताच ब्लॉग तयार केला आहे तर तुमच्यासाठी blogger dashboard देखील नवीनच असेल. तुम्हाला ब्लॉगमध्ये पोस्ट लिहिण्या अगोदर blogger dashboard मधील सर्व tools चि माहिती असणे आवश्यक आहे. कारण blogger मधील tools वापरूनच तुम्ही तुमच्या ब्लॉगला manage आणि customize करू शकता.

म्हणूनच आजच्या या पोस्ट मध्ये आपण blogger dashboard मधील त्या सर्व टूल्स बद्दल माहिती आणि त्यांचा उपयोग जाणून घेणार आहोत. जेणे करून तुम्ही अगदी सहजपणे पोस्ट लिहू शकाल आणि पोस्टला व्यवस्थित customize देखील करू शकाल.

Blogger dashboard म्हणजे काय? ( What is blogger dashboard in marathi)

जेंव्हा तुम्ही blogger.com वर तुमचा नवीन ब्लॉग तयार करता तेंव्हा ब्लॉगर open केल्यानंतर तुमच्या समोर जो ब्लॉगर चा इंटर्फेस येतो त्यालाच ब्लॉगर dashboard असे म्हणतात.

या ब्लॉगर दशबोर्ड मध्ये विविध टूल्स असतात ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या ब्लॉगला manage आणि customize करू शकता. हे सर्व टूल्स तुम्हाला माहिती असावेत. यातील काही टूल्स तुम्हाला माहिती देखील असतील पण काही टूल्स तुमच्यासाठी नक्कीच नवीन असतील.

यातील टूल्स वापरूनच तुम्ही तुमच्या ब्लॉगची theme एडिट करू शकता. तसेच ब्लॉगची ट्रॅफिक देखील analyze करू शकता म्हणजे तुमच्या ब्लॉगला दररोज जगभरातून किती लोक भेट देत आहेत, कोण कोणत्या देशातून लोक ब्लॉगला भेट देत आहेत याची माहिती मिळू शकते.

हे देखील वाचा:

तसेच तुम्हाला तुमची कोणती पोस्ट गूगल मध्ये rank करत आहे व कोणत्या पोस्टला किती views येत आहेत याची देखील माहिती मिळू शकेल.

Blogger मधील सर्व टूल्स ची माहिती आणि त्यांचा उपयोग:

येथे blogger dashboard हा wordpress dashboard च्या तुलनेत खूप सिंपल आहे. येथे तुम्हाला ब्लॉगला customize करण्यासाठी सर्व पर्याय उपलब्ध आहेत आणि हा ब्लॉगर्सचा इंतरफेस समजण्यासाठी देखील खूप सोपा आहे. येथे आपण blogger dashboard मधील सर्व आवश्यक टूलची एक एक करून माहिती घेणार आहोत.

Blogger dashboard information in marathi
Blogger dashboard म्हणजे काय
 • Google account : तुम्ही ज्या ईमेल आयडी द्वारे ब्लॉगर मध्ये log in केले आहे किंवा ज्या ईमेल आयडी द्वारे ब्लॉग बनवला आहे तो ईमेल आयडी येथे दिसेल. येथून तुम्ही ईमेल आयडी देखील बदलू शकता.
 • Blog name: तुमच्या ब्लॉगचे जे नाव आहे ते इथे दर्शविले जाईल. तसेच जर तुमच्या ईमेल आयडी वर एकपेक्षा जास्त ब्लॉग असतील तर तुम्ही येथून ब्लॉग बडलाऊ शकता.
 • New post: येथून तुम्ही नवीन पोस्ट लिहू शकता.
 • Posts: येथे तुम्ही लिहिलेल्या सर्व पोस्ट दिसतील. येथून तुम्ही पोस्टला publish, unpublish करू शकता. तसेच तुम्ही पोस्टला revert to draft म्हणजेच ड्राफ्ट मध्ये देखील परत पाठवू शकता.
 • Stats: येथे तुम्ही तुमच्या ब्लॉगच्या सर्व statistics पाहू शकता. म्हणजेच दररोज किती page views येत आहेत, visitors कोण कोणत्या देशातून व किती येत आहेत, कोणत्या पोस्टवर जास्त views आहेत यासारखी सर्व माहिती तुम्ही या सेक्शन मध्ये पाहू शकता.
 • Comments: तुमच्या ब्लॉगच्या visitors नी केलेल्या comments तुम्हाला येथे दिसतील. येथून तुम्ही कमेंट चे व्यवस्थापन करू शकता. तुम्ही कमेंट ला approve, unapprove करणे तसेच spam करणे इत्यादी येथे करू शकता.
 • Earnings: तुमचा ब्लॉग monitize झाल्यावर ब्लॉगची सर्व कमाई येथे दिसेल. येथून तुम्ही ब्लॉग साठी add unit तयार करू शकता तसेच adsense साठी अर्ज देखील करू शकता. तुमच्या ब्लॉगला adsense ने approve केल्यावर सर्व कमाईचा डेटा तुम्हाला येथे दिसेल.
 • Pages: येथे तुम्ही ब्लॉग साठी आवश्यक असणारे सर्व pages तयार करू शकता. जसे की about us, contact us, disclaimer, privacy policy, इत्यादी. हे सर्व पेज ब्लॉगला adsense ची मान्यता मिळवण्यासाठी खूप आवश्यक असतात.
 • Layout: येथून तुम्ही तुमच्या blogger template चे लेआऊट तयार करू शकता. येथून तुम्ही कस्टम टेम्प्लेट मधील अनावश्यक गोष्टी काडून टाकू शकता तसेच नवीन आवश्यक गोष्टी ब्लॉगमध्ये लावू शकता. जसे की author box, code box, popular post, इत्यादी.
 • Theme: येथून तुम्ही तुमच्या ब्लॉग ची theme customize करू शकता. तसेच तुमच्या theme चा html code देखील येथून एडिट करता येऊ शकतो.
 • Settings: येथून तुम्ही तुमच्या ब्लॉगच्या सर्व सेटिंग्ज manage करू शकता. Robots.txt file लावणे, ब्लॉगचे नाव बदलणे, ब्लॉगचे discription लिहिणे,इत्यादी सेटिंग तुम्ही येथून करू शकता.
 • Reading list: तुम्ही जर इतर कोणते ब्लॉग subscribe केले असतील तर ते सर्व ब्लॉग तुम्हाला येथे वाचायला मिळतील.
 • View blog: येथून तुम्ही ब्लॉग बघू शकता तसेच ब्लॉग वरील पोस्ट येथून वाचू शकता.

निष्कर्ष – blogger dashboard information marathi

नवीन ब्लॉग सुरु केल्यानतर blogger dashboard ची माहिती ही नवीन ब्लॉगरला माहिती असणे गरजेचे असते. कारण ब्लॉगला edit, manage आणि customize करण्याचे सर्व काम हे blogger वरील टूल्स च्याच मदतीने केले जाते.

म्हणूनच आजच्या या पोस्टमध्ये blogger dashbord बद्दल माहिती blogger dashboard information in marathi देण्याचा प्रयत्न केला.

ही सर्व माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल. या पोस्टला नवीन ब्लॉगर सोबत नक्की शेअर करा. 

जेणेकरून त्यांना देखील ही माहिती अगदी सोप्या भाषेत मिळू शकेल, धन्यवाद…!!!


या पोस्टला नक्की शेअर करा 😜

Leave a Comment

x