Favicon म्हणजे काय? आणि तो ब्लॉगमध्ये कसा लावायचा?

या पोस्टला नक्की शेअर करा 😜

 नमस्कार मंडळी, काय म्हणता? आज आपण ब्लॉग मध्ये favicon लावायला शिकणार आहोत पण त्याआधी तुम्हाला favicon म्हणजे काय याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला favicon ब्लॉगमध्ये कसा लावावा समजू शकतं.तर चला मग पाहूया favicon काय असतो, favicon म्हणजे काय आणि तो ब्लॉग मध्ये कसा लावावा.

Favicon म्हणजे काय
Favicon म्हणजे काय?

 

मित्रांनो फविकॉन बद्दल नवीन ब्लॉगर ला जास्त माहिती नसते आणि सुरुवातीला मलाही नव्हती पण तुम्हाला या लेखामध्ये favicon बद्दल पूर्ण माहिती मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Favicon म्हणजे काय ( what is favicon in marathi)

मित्रानो फविकोन ही तुमच्या ब्लॉग ची ओळख असते favicon ब्लॉग मध्ये लावल्याने तुमचा ब्लॉग इतरांना ओळखायला सोपं होतं. इंटरनेट वर कुणीही तुमच्या favicon वरून तुमच्या ब्लॉग ल ओळखू शकतो कारण जवळपास सारख्या नावाचे अनेक संकेतस्थळे इंटरनेट वर असू शकतात त्या सर्वांमध्ये favicon तुमच्या ब्लॉग ची वेगळी ओळख निर्माण करते.

तुम्ही जेव्हा google वर एखादी माहिती सर्च करता त्यावेळेस गूगल तुम्हाला त्याविषयी लाखों परिणाम दाखवतो, अनेक संकेतस्थळे दाखवतो ज्यावर तुम्हाला आवश्यक अशी माहिती आहे. त्या संकेतस्थळाच्या डाव्या बाजूला एक छोटासा आयकॉन असतो त्यालाच favicon म्हटलं जातं. प्रत्येक ब्लॉग चा favicon वेगवेगळा असतो.

हा फाविकॉन तुमच्या ब्लॉग च्या नावावरून किंवा तुमच्या ब्लॉग च्या संबंधित एकाद्य इमेज वरून बनवला जातो त्यामुळे तुमचा ब्लॉग तुम्हाला अनेक ब्लॉगमध्ये लवकर ओळखता येतो. Favicon हा अत्यंत संक्षिप्त असतो. त्यावर ब्लॉगच पूर्ण नाव नसून केवळ एखादं अक्षर असतं किंवा मग एखादं चिन्ह.

ब्लॉगवर favicon लावणं का आवश्यक आहे?

मित्रांनो तुम्हाला favicon म्हणजे काय असतो तर कळलंच असेल पण तुम्हाला माहिती आहे का हो की ब्लॉगवर फविकॉन लावणं का गरजेचं आहे? यामुळे तुमच्या ब्लॉग वर काय परिणाम होईल?

  • इंटरनेट वर तुमचा ब्लॉग ओळखण सोपं होईल
  • तुमचा ब्लॉग attractive दिसेल
  • ब्लॉग ला adsense ची मान्यता लवकर मिळवण्यासाठी देखील फविकॉन लावणं आवश्यक असतं
  • जेव्हा एखादी व्यक्ती तुमचा ब्लॉग बुकमार्क करेल तेंव्हा त्याला त्याच्या बुकमार्क लिस्टमधील तुमचा ब्लॉग लगेच ओळखता येईल

ब्लॉगवर favicon कसा लावावा (how to add favicon on blog in marathi)

तर चला आता आपण पाहूया की तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये favicon कसा add करू शकता. या साठी मी step by step माहिती खाली दिली आहे त्याचे तुम्ही अनुसरण करून ब्लॉगमध्ये favicon लावू शकता

 

नोट: favicon ब्लॉग मध्ये लावण्या अगोदर तुम्ही तो तयार करून तुमच्या फाईल्स मध्ये save केलेला असावा. जेणे करून ब्लॉगमध्ये favicon लावताना तो सहज उपलब्ध होईल.तुम्हाला जर favicon बनवता येत नसेल तर मला खाली कमेंट करा. मी favicon कसा तयार करावा यावर पुढचा लेख लिहितो.

ब्लॉगमध्ये फविकॉन कसा जोडावा

  1. सर्वात पहले तुम्हाला गूगल वर जाऊन blogger.com टाईप करायचं आहे
  2. त्यानंतर तुम्हाला तुमच्या emil id ने ब्लॉगर मध्ये log in करायचं आहे
  3. ब्लॉगर dashboard मध्ये तुम्हाला layout पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा
  4. Layout मध्ये तुम्हाला वरच्या कोपऱ्यात favicon चा पर्याय दिसेल तिथे क्लिक करा
  5. आता तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून favicon निवडायचा आहे आणि त्यानंतर अपलोड वर क्लिक करा
  6. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ब्लॉग वर favicon लावू शकता.

अभिनंदन…तुम्ही यशस्वीरीत्या ब्लॉगमध्ये favicon लावायला शिकलात.

निष्कर्ष: favicon म्हणजे काय आणि ब्लॉग वर favicon कसा लावायचा?

मित्रांनो या लेखमध्ये आपण favicon म्हणजे काय, favicon काय असतो आणि ब्लॉगमध्ये favicon कसा लावावा याबद्दल माहिती घेतली.तुम्ही जर अजून तुमच्या ब्लॉग मध्ये favicon लावला नाही तर तो अवश्य लावा. यानंतरच्या पोस्ट मध्ये आपण favicon कसा तयार करावा याबद्दल माहिती पाहू.

मंडळी मला अशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. ही माहिती तुमच्या मित्रमंडळी व नातेवाईक सोबत शेअर करायला विसरू नका. खाली काही सोशल मीडिया बटण आहेत ते दाबून तुम्ही ही माहिती सोशल मीडिया वर शेअर करू शकता, धन्यवाद…!


या पोस्टला नक्की शेअर करा 😜

Leave a Comment

x