blogger vs wordpress ब्लॉग साठी कोणता प्लॅटफॉर्म आहे उत्तम?

या पोस्टला नक्की शेअर करा 😜

 blogger vs wordpress नमस्कार मित्रानो मराठी युक्ती ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. यापूर्वीच्या लेखामध्ये आपण बघितलं की blogger वर ब्लॉग कसा तयार करावा आणि wordpress वर ब्लॉग कसा तयार करावा. आपण blog आणि blogging म्हणजे काय याबद्दल देखील माहिती घेतली. आजच्या या लेखामध्ये आपण माहिती घेणार आहोत blogger vs wordpress ची म्हणजेच ब्लॉग तयार करण्यासाठी blogger आणि wordpress या दोन्हीपैकी कोणता प्लॅटफॉर्म बेस्ट आहे. तर चला मग सुरू करूया…

blogger vs wordpress बेस्ट कोण आहे?
blogger vs wordpress


मित्रांनो इंटरनेट वर ब्लॉग तयार करण्यासाठी खुप सारे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत जसे की blogger, wordpress, tumblr, wix, medium, weebly, इत्यादी. परंतु या सर्व प्लॅटफॉर्म पैकी मोजकेच प्लॅटफॉर्म असे आहेत जे की ब्लॉगींग साठी प्रचलित आहेत आणि सर्वात जास्त वापरले जातात. यामध्ये blogger आणि wordpress हे दोन प्लॅटफॉर्म सर्वाधिक प्रसिद्ध आहेत आणि जास्तीत जास्त लोक त्यांना ब्लॉग तयार करण्यासाठी वापरतात. हे सर्व तर तुमच्या लक्षात आलं असेल पण तुमच्या मनात आता प्रश्न पडला असेल की blogger आणि wordpress या दोन्हीपैकी कोणता प्लॅटफॉर्म सर्वोत्कृष्ट आहे.

सुरुवातीला नवीन ब्लॉगर ब्लॉगींग प्लॅटफॉर्म ला निवडताना खुप चुका करतात. त्यामुळे त्यांच्या पोस्ट rank होत नाहीत, त्यांना ब्लॉगींग मध्ये यश मिळत नाही. मग नंतर त्यांच्या लक्षात येत की आपण चुकीचा प्लॅटफॉर्म निवडला . म्हणून काही ब्लॉगर तर यश मिळत नाहीये म्हणून ब्लॉगींग च सोडून देतात.

थोडा विचार करा जेव्हा तुम्ही 3-4 महिने ब्लॉगींग साठी देता आणि नंतर तुम्हाला काही कारणास्तव ब्लॉग बंद करावा लागला तर ही किती दुखास्पद गोष्ट आहे. तुमचे पूर्ण प्रयत्न वाया जातील. त्यामुळे ब्लॉगींग प्लॅटफॉर्म निवडताना बिलकुल चुका करू नका! 

आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत की blogger वर ब्लॉग तयार करावा की wordpress वर. या दोन्हीपैकी कोणता प्लॅटफॉर्म ज्यास्त फायदेशीर ठरेल.

Blogger vs wordpress दोन्हीपैकी कोणता प्लॅटफॉर्म उत्तम आहे?

मित्रांनो प्रत्येक नवीन ब्लॉगर जेव्हा ब्लॉग तयार करण्यासाठी विचार करतो त्याच्या मनात हा नक्कीच प्रश्न असतो की ब्लॉग blogger वर बनवावा की wordpress वर कारण दोन्ही प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी नवीन असतात आणि त्याला त्याबद्दल अनुभव ही नसतो. म्हणून आज आपण या लेखामध्ये विविध पैलूंचा आधारे या गोष्टीचा आढावा घेणार आहोत.

आपण खालील पैलू च्या आधारे ब्लॉगर आणि वर्डप्रेस यांची पडताळणी करणार आहोत:

  1. मुफ्त प्लॅटफॉर्म (free platform)
  2. मालकी (ownership)
  3. प्रदर्शन (Appearance)
  4. रेंकिंग (Ranking)
  5. एस ई ओ (Search engine optimization)
  6. सानुकुलन (Customization)
  7. कमाई (Earning)

Blogger vs wordpress कोण उत्तम आहे

मुफ्त प्लॅटफॉर्म (free platform)

मित्रांनो असे अनेक ब्लॉगर आहेत जे आपला ब्लॉग बनवून पैसे तर कमावू इच्छिता परंतु त्यांच्याकडे ब्लॉगींग मध्ये invest करायला पुरेशे पैसे नसतात. याचे अनेक कारणं असू शकतात काही विद्यार्थी असतात ज्यांना की असे ऑनलाईन पैसे invest करायला घरून पैसे दिले जात नाहीत, काहींची पैसे invest करायची इच्छा नसते कारण त्यांना आपण ब्लॉगींग मधून पैसे कमवू शकतो की नाही यावर त्यांना विश्वास नसतो.
 
म्हणून ब्लॉगींग क्षेत्रात येऊ इच्छिणारे बहुतांश लोक हे सुरूतीला फ्री ब्लॉग पासूनच सुरुवात करतात. कारण त्यांच्या मनात असतं की आपण सूरूतीला फ्री ब्लॉग बनवून पैसे कमावू आणि पुरेशे पैसे जमले की आपण मग ते domain आणि hosting साठी खर्च करू.
 
Blogger आणि wordpress चा विचार केला तर blogger हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण एकही रुपया खर्च न करता फ्री मध्ये ब्लॉग सुरू करू शकतो. ब्लॉगर हे एक गूगल च प्रॉडक्ट असल्याने तेथे आपल्याला फ्री मध्ये blogspot domain आणि hosting मिळते आणि विशेष म्हणजे आपण या फ्री ब्लॉग मधून देखील पैसे कमावू शकतो.
 
पण wordpress वर जर तुम्हाला professional blog बनवायचा असेल तर तुम्हाला एक domain आणि hosting ची गरज भासते. म्हणून तुम्ही जर नवीन फ्री ब्लॉग बनवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी blogger उत्तम आहे.
 

मालकी (Ownership)

मित्रांनो तुम्ही तुमचा ब्लॉग बनवत असाल तर काय तुम्हाला माहीत आहे की तुमच्या ब्लॉग चा मालक कोण असणार? मी जर म्हणलं की ब्लॉग जरी तुम्ही बनवला असला तरी तुम्ही त्याचे मालक नाही आहात,तर तुम्हाला विश्वास बसेल?
 
होय, तुम्ही जर तुमचा ब्लॉग blogger वर बनवला असेल तर तुम्ही तुमच्या ब्लॉग चे मालक नाही आहात. कारण blogger हे गूगल चे product असल्यामुळे तुमच्या ब्लॉग ची पूर्ण मालकी गूगल कडे आहे. Google ला जर वाटलं तर गूगल केव्हाही तुमचा ब्लॉग बंद करू शकतो तुम्हाला विचारण्या शिवाय. परंतु google कुणाचाही ब्लॉग विनाकारण बंद नाही करत.जेव्हा तुम्ही google च्या नियमांचे उल्लंगण कराल तेव्हाच गूगल तुमच्या ब्लॉग विरूद्ध अँक्शन घेऊ शकतो, ब्लॉग बंद करू शकतो.
 
पण wordpress च्या बाबतीत तसं नाही, तुमचा ब्लॉग wordpress वर असेल तर तुम्ही तुमच्या ब्लॉग चे मालक असाल. तुम्हाला तुमच्या मनानुसार ब्लॉग manage आणिcustomize करण्याचे अधिकार असतील. गूगल तुम्हाला नोटीस दिल्या शिवाय तुमच्या ब्लॉग ला बंद नाही करू शकणार. तुम्ही जर google च्या नियमांचे उल्लंगण केलं तर गूगल केवळ तुमच्या पोस्ट rank होण बंद करू शकतं.
 

प्रदर्शन (Appearance)

मित्रांनो ब्लॉगच प्रदर्शन, सुंदरता पूर्णतः अवलंबून असते ब्लॉग च्या theme/template वर. जेवढं आकर्षक तुमच्या ब्लॉगच टेम्प्लेट असेल तेवढाच सुंदर तुमचा ब्लॉग दिसेल आणि तेवढेच जास्त लोक तुमच्या ब्लॉग वाचायला पसंद करतील.
 
Blogger आणि wordpress वरील टेम्प्लेट ची तुलना केली तर wordpress वरील टेम्प्लेट हे सर्वात जास्त युजर फ्रेंडली आहेत. ते युजर ला एक आकर्षक लूक प्रधान करतात आणि blogger च्या तुलनेत टेम्प्लेट customize करणं पण फार सोपं आहे.
 
पण ब्लॉगर वरील टेम्प्लेट हे wordpress इतके आकर्षित नाहीयेत आणि ब्लॉगर वर टेम्प्लेट customize करायला पण खुप अडचणी येतात.
 

रैंकिंग (ranking)

हा एक सर्वात महत्वाचं पैलू आहे. कोणता ब्लॉग जास्त rank करतो blogger वरचा की wordpress?
 
Ranking च्या तुलनेत देखील वर्डप्रेस च पुढे आहे. आपण पाहिले असेल की गूगलच्या पहिल्या पानावर जास्त तर वर्डप्रेस ब्लॉग च असतात त्याच कारण असं आहे की वर्डप्रेस ब्लॉग ब्लॉगर पेक्षा जास्त युजर फ्रेंडली असतात आणि त्यावर seo करण देखील फार सोपा आहे.
 

सर्च इंजिन ओप्तमिझेशन (seo)

मित्रांनो ब्लॉगींग मध्ये यशस्वी होण्याचा सर्वात म्हतावची गोष्ट म्हणजे search engine optimization (seo). आपण जर ब्लॉग चा चांगल्या प्रकारे seo करायला शिकलात तर तुमच्यासाठी ब्लॉगींग मधून पैसे कमावणं काही अवघड नाही.
 
कारण seo ही एक अशी technique आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या ब्लॉग पोस्ट गूगल मध्ये rank करू शकता आणि गूगल वरून भरपूर ट्रॅफिक तुमच्या ब्लॉग वर आनु शकता.
 
WordPress आणि blogger दोन्ही वर देखील आपण seo करू शकतो पण wordpress वर seo करणं blogger च्या तुलनेत थोडा सोपं आहे. कारण wordpress मध्ये आपल्याला rank math, yoast seo सारखे seo plugins मिळतात जे की ब्लॉग चा seo करायला खूप मदत करतात. त्यांच्या द्वारे seo करणं खूप सोपं होतं.
 

Customization

Customization च्या तुलनेत देखील वर्डप्रेस च समोर आहे . कारण वर्डप्रेस वर ब्लॉग customize करायला खूप सोपं जातं आपण अगदी सोप्या स्टेप्स मध्ये सहज रित्या वर्डप्रेस वर ब्लॉग ल customize करू शकतो.
 
पण ब्लॉगर मध्ये customization करणं थोडा कठीण आहे. आपल्या जर ब्लॉगर मध्ये stylish heading, table, lists तयार करायच्या असतील तर त्यासाठी ब्लॉगर मध्ये आपल्या ला html, css कोड पेस्ट करावा लागतो. तुम्हाला जर कोडिंग येत नसेल तर तुमच्यासाठी हा कोड बनवणं फार कठीण आहे.
 
परंतु याच गोष्टी वर्डप्रेस मध्ये add करणं फार सोपं आहे. वर्डप्रेस मध्ये आपल्याला अनेक plugins मिळतात ज्यांच्या मदतीने आपण एका क्लिक मध्ये या गोष्टी add करू शकतो.
 

कमाई (Earning)

सर्वात महत्वाची गोष्ट ज्यासाठी बहुतेक लोक ब्लॉगींग करतात ती म्हणजे कमाई. जास्त कमाई कोणत्या ब्लॉग द्वारे होईल ब्लॉगर की वर्डप्रेस?
 
आपण वरील पैलू मध्ये बघितलं की वर्डप्रेस चा ब्लॉग युजर फ्रेंडली आहे, त्यात seo करणं सोपं आहे आणि लवकर रंक होतो त्यामुळे वर्डप्रेस ब्लॉग ल जास्त इम्प्रेशन आणि क्लिक मिळतात व तो ब्लॉगर च्या तुलनेत जास्त कमाई करतो.
 

Blogger vs wordpress कोणत्या प्लॅटफॉर्म वर ब्लॉग बनवावा ?

मित्रानो आपण blogger vs wordpress ची पडताळणी करण्यासाठी अनेक पैलूंचा वापर केला. काही पैलू मध्ये ब्लॉगर उत्तम ठरला तर काही मध्ये wordpress. आता हे तुमच्या वर आवलंबून आहे की तुम्हाला कोणता प्लॅटफॉर्म आवडतो तर.
 
 blogger कडे wordpress पेक्षा फक्त एकाच असा चांगला पैलू आहे तो म्हणजे फ्री domain आणि hosting. मात्र वर्डप्रेस मध्ये तुम्हाला domain आणि hosting विकत घ्यावी लागेल. बाकी सर्व पैलू मध्ये वर्डप्रेस च उत्तम ठरला .
 
माझ्या मते आपण जर ब्लॉगही मध्ये नवीन असाल तर ब्लॉगर च्या फ्री ब्लॉग पासूनच सुरुवात करा, नंतर तुम्ही तुमचा ब्लॉग वर्डप्रेस वर हलवू शकता. कारण ब्लॉगींग मध्ये सुरुवातीला खुप चुका होतात त्यामुळे आधी तुम्ही फ्री ब्लॉग बनवून ब्लॉगींग शिका, ब्लॉगींग बद्दल पूर्ण माहिती मिळवा आणि मग नंतरच वर्डप्रेस वर ब्लॉग बनवा. शेवटी निर्णय तुमचा आहे , मी फक्त माझा फ्री सल्ला दिला आहे.
 

निष्कर्ष – blogger vs wordpress 

मित्रानो अनेक जण ब्लॉगींग करू इच्छित आहेत परंतु त्यांना ब्लॉग कुठे सुरू करावा ब्लॉगर की वर्डप्रेस या बद्दल प्रश्न आहेत. त्यामुळे मी आजच्या पोस्ट मध्ये हेच सांगीतलं की blogger vs wordpress कोण बेस्ट आहे? 
 
मला आशा आहे की आपल्या ला ही सर्व माहिती समजली असेल. खाली काही सोशल मीडिया बटण आहेत त्यावर क्लिक करून ही माहिती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, धन्यवाद….!

या पोस्टला नक्की शेअर करा 😜

2 thoughts on “blogger vs wordpress ब्लॉग साठी कोणता प्लॅटफॉर्म आहे उत्तम?”

  1. मला एकच प्रश्न पडला आहे की, मी जर ब्लॉगर वर फ्री ब्लॉग पोस्ट केल्यानंतर मला वर्डप्रेसवर परत ब्लॉग पोस्ट करायचे असल्यास मी ब्लोगर वरून वर्डप्रेसवर माझे ब्लॉग्स कसे पोस्ट करू शकतो म्हणजेच ब्लॉगर वरच्या पोस्ट मी वर्डप्रेस वर कसा घेऊ शकतो कारण ब्लॉगर वर डोमेन आणि होस्टेल फ्री आहे आणि बाकीचं सर्व वर्डप्रेसवर चांगली आहे म्हणून मला याबद्दल थोडी माहिती द्यावी.

    Reply

Leave a Comment

x