तुम्ही पण ब्लॉगींग करण्याचा विचार करताय तर मग हे एकदा वाचाचं – ब्लॉगींग चे फायदे आणि नुकसान?

या पोस्टला नक्की शेअर करा 😜

 ब्लॉगींग आज युगात इतकी प्रसिद्ध झाली आहे की जो तो ब्लॉगींग करण्याचा विचार करत आहे. आज दररोज गूगल वर लाखों लोग ब्लॉग बनवून पैसे कमावत आहेत. काही लोक तर असे आहेत की ज्यांनी ब्लॉगींग साठी आपले जॉब देखील सोडले कारण ते ब्लॉगींग मार्फत जॉब पेक्षा जास्त कमावत होते. हा ही गोष्ट नक्की आहे की ब्लॉगींग मध्ये सध्या खुप scope आहे आणि लाखों रुपये कमावण्याची संधी देखील! 

Blogging चे फायदे आणि नुकसान
ब्लॉगींग चे फायदे आणि नुकसान

 

पण आपण कधी विचार केलाय का, की दररोज लाखों लोक गूगल वर ब्लॉग बनवतात, त्यातील सर्वच ब्लॉगींग मध्ये यशस्वी होतात का हो? याच सरळ उत्तर आहे, नाहीं! कारण यातील मोजकेच लोक असतात जे ब्लॉग बनवून त्यावर रोज काम करतात आणि पैसे देखील कमावतात.

आपल्याला ब्लॉगींग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो पैसा कारण बहुतेक लोक ब्लॉगींग क्षेत्रात पैसे कमावण्यासाठी च येतात, ब्लॉगिंग वर आपला छंद जोपासणारे तुम्हाला फार कमी मिळतील अगदी बोटावर मोजण्याइतके! परंतु काय कदी तुम्ही विचार केलाय की ब्लॉगींग करून पैसे कमावणं येवढं सोपं आहे का?

मुळीच नाही! ब्लॉगींग करून पैसे कमावणं इतका पण सोपं नाही जेवढं तुम्ही विचार करताय. कारण ब्लॉगींग सुरू केल्यानंतर तुम्हाला नियमित पणे पोस्ट लिहाव्या लागतात, ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला नियमित काम करावं लागतं आणि विशेष म्हणजे तुमच्याकडे संयम असणं फार आवश्यक आहे. 

ब्लॉगींगचे जसे काही फायदे आहेत त्याचप्रमाणे काही नुकसान देखील आहेत. त्यामुळे आज या पोस्ट मध्ये आपण बघणार आहे ब्लॉगींग चे फायदे आणि नुकसान काय आहेत? (advantages and disadvantages of blogging in marathi, benefits of blogging in marathi). ब्लॉगींग चे कोण कोण ते फायदे, ब्लॉगिंग चे कोण कोण ते नुकसान आहेत

Blogging चे फायदे आणि नुकसान कोण कोणते आहेत ?

ब्लॉगींग चे फायदे (advantages of blogging in marathi):

तुमच्या लेखन कौशल्यात सुधार होईल

Blogging मध्ये नियमित वेगवेगळे लेख तुम्हाला लिहावे लागतील त्यामुळे तुमच्या लेखन कौशल्यात नक्कीच सुधार होईल. तुम्ही पहिल्या पेक्षा खूप चांगल्या प्रकारे लिहायला शिकाल, तुम्हाला तुमचे विचार प्रभावीपणे लोकांसमोर मांडण्याची सवय लागेल.

तुम्हाला ब्लॉगींग मध्ये लेख लिहिण्याचा खूप सराव होईल आणि त्यामुळे तुमचं लेखन कौशल्य देखील विकसित होईल.

तुम्हाला नवनवीन माहिती वाचण्याची सवय लागेल

ब्लॉगींग करताना तुम्हाला नवीन लेख लिहण्यासाठी विविध विषय शोधावे लागतील आणि त्या विषया संबंधित माहिती देखील गोळा करावी लागणार. त्यासाठी तुम्ही इंटरनेट सर्च कराल विविध माहिती वाचाल त्यातील तुमच्या लेखाला उपयुक्त माहिती तुम्ही शोधाल. तुम्ही विविध पुस्तकातून देखील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे तुम्हाला नाव नवीन माहिती वाचण्याची सवय देखील लागेल. कारण तुम्हाला ब्लॉगींग मध्ये लेख लिहिण्यासाठी नियमित माहितीच संशोधन करावे लागेल.

तुम्ही तुमच्या घरी बसून काम करू शकता

तुम्ही पाहिले असेल की कोणताही काम असू त्यासाठी तुम्हाला त्यांच्या ऑफिस, कंपनी मध्ये जाऊन काम करावे लागते. काम करण्याचे ठिकाण जर तुमच्या घरापासून दूर असेल तर एकतर तुमचे प्रवासामध्ये पैसे खर्च होतील आणि विनाकारण वेळ ही वाया जाईल. तुम्हाला खूप वेळा हे कंटाळवाण देखील वाटला असेल, हो न!

पण ब्लॉगींग करण्यासाठी तुम्हाला कोणत्या कंपनी किंवा ऑफिस मध्ये जाण्याची आवश्यकता नाही तुम्ही घरी बसल्या ब्लॉगींग करू शकता. तुम्हाला जिथे आरामदायी वाटेल तिथे ब्लॉगींग करू शकता.

वेळेचे बंधन नाही

ब्लॉगींग मध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला वेळेचं काहीच बंधन नाही तुम्ही कधीही ब्लॉग लिहू शकता. काही जणांना सकाळी लवकर उठून दिवसा काम करण्याची सवय असते, ते तेंव्हा ब्लॉग लिहू शकता. काही जणांना सवय असेल तर ते रात्री उशीापर्यंत देखील ब्लॉग लिहू शकतात.

ज्याप्रमाणे इतर कामांचा एक ऑफिसियल टाईम असतो, त्याच वेळेत तुम्हाला काम करावं लागत. त्याप्रमाणे ब्लॉगिंग मध्ये कसलाही बंधन नाही तुम्ही तुमच्या सोयीस्कर वेळेनुसार काम करू शकता.

तुम्हीच तुमच्या buissness चे मालक असाल

खुप लोकांना विविध विषयावर लेख लिहायला आवडतात म्हणून ते छंद जोपासण्यासाठी ब्लॉगींग करतात. पण आज ब्लॉगींग छंद जोपासण्यासाठी केली जात नाही तर आज ब्लॉगींग करण्याचं मुख्य हेतू बनलाय पैसे कमावणे. त्यामुळे कित्येक जणांसाठी ब्लॉगींग हा एक व्यवसाय बनला आहे. ते फुलं टाईम ब्लॉगींग करून लाखो पैसे कमावत आहेत.

त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या ब्लॉगींग buissness चे मालक असाल. येथे तुम्हाला कुणाच्या हाताखाली काम करण्याची आवश्यकता नाहीत. उलट तुम्हीच ब्लॉग आर्टिकल लिहिण्यासाठी एखादा writer ठेऊ शकता.

तुम्ही part time काम देखील करू शकता

ब्लॉगींग मध्ये तुम्हाला part time काम करण्याची देखील संधी आहे.म्हणजेच तुम्ही तुमचे इतर काम करून देखील ब्लॉगींग साठी थोडा वेळ देऊ शकता. असे अनेक लोक आहेत जे जॉब करत करत ब्लॉगींग देखील करतात. त्यामुळे ब्लॉगींग मध्ये असं काही बंधन नाहीये की तुम्ही पूर्ण वेळ ब्लॉगींग का द्यायला हवा. तुम्ही तुमच्या कमाव्यातरिक्त उरलेला शिल्लक वेळ देखील ब्लॉगींगसाठी देऊ शकता.

पण ब्लॉगींग मध्ये नियमित असण खुप महत्वाचं आहे, तुम्हाला नियमित लेख ब्लॉग मध्ये publish करावे लागतील.

तुम्हाला इंटरनेट वर प्रसिद्धी मिळेल

हां, तुम्ही ब्लॉगींग मध्ये जर यश मिळवलं आणि तुमचा ब्लॉग जर गूगल वर प्रसिद्ध झाला तर तुम्हाला देखील प्रसिद्धी मिळू शकते. असे इंटरनेट वर अनेक ब्लॉग आहेत जे की खुप प्रसिद्ध आहेत, त्या ब्लॉग्स मुळे त्यांच्या ब्लॉग writer ल देखील खूप प्रसिद्धी मिळाली आहे.

तुम्ही लाखो रुपये कमावू शकता

आपल्या सर्वांना तर माहीतच असेल की ब्लॉगींग हे पैसे कमावण्याचा hub आहे . इथे तुम्हाला पैसे कमावण्यासाठी कुठल्याही मर्यादा नाहीत. तुम्ही अमर्याद पैसे कमावू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला आधी खूप मेहनत घ्यावी लागेल.

तुम्हाला अगोदर तुमचा ब्लॉग चांगल्याप्रकारे customize करावा लागेल, त्यावर कमीत कमी 20-25 लेख लिहावे लागतील आणि नंतर तुम्ही मग गूगल adsense ला अर्ज करू शकता. गूगल adsense ने जर तुमच्या ब्लॉग ला मान्यता दिली तर मग तुम्ही देखील ब्लॉग वर जाहिराती लाऊन लाखों पैसे कमावू शकता.

सुरुवातीला पैसे गुंतवायचे गरज नाही

कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्या समोर सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे व्यवसायात गुंतवणूक (invest) करण्यासाठी लागणारे पैसे. प्रत्येक व्यवसाय सुरू करण्यासाठी निदान कमीत कमी का वाहिना पण गुंतवणूक लागते. 

पण ब्लॉगींग हा असा एक व्यवसाय आहे जेथे तुम्ही फ्री पासून सुरू करू शकता. तुम्हाला सुरुवातीला एक रुपया देखील invest करण्याची गरज भासणार नाही. नंतर तुम्हाला मग जर domain आणि hosting मध्ये invest करायचं असेल तर तुम्ही करू शकता. त्यामुळे कुणीही ब्लॉगींग करू शकतो.

तुम्ही टीम बनवून देखील काम करू शकता

जर तुम्ही 1 पेक्षा जास्त ब्लॉग चालवत असाल आणि तुमच्या कडे कामाचा व्याप वाढत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत टीम बनवून देखील काम करू शकता. यामुळे तुमचं काम आणखी सोपं होईल आणि जास्त कामाचा ताण वाढणार नाही.

ब्लॉगींग चे नुकसान (disadvantages of blogging in marathi):

तुम्हाला नियमित काम करावे लागेल

ही ब्लॉगींग मधील सर्वात महत्वाची गोष्ट आहे ज्यामुळे अनेक ब्लॉगर्स अयशस्वी होतात. कारण फक्त ब्लॉग बनवणं पुरेस नसता तर त्यावर नियमितपणे लेख लिहावे लागतात. तुम्ही जर ब्लॉगींग मध्ये नियमित नसाल तर तुमच्या पोस्ट rank व्हायला खूप अडचणी येतात. गूगल फक्त त्याच ब्लॉग ला promote करतो ज्यावर नियमित लेख येत असतात.

त्यामुळे तुम्ही ब्लॉगींग करायचं विचार करत असाल तर तुम्हाला नियमितपणे लेख लिहावे लागतील. तुम्ही आज एक लेख लिहिला आणि नंतर दुसरा लेख १०-१५ दिवसांनी लिहिताय, असं चालत नाही! तुम्हाला एका आठवड्यामध्ये कमीत कमी १-२ तरी लेख लिहावे लागतील.

Copyright strike ब्लॉगवर येऊ शकते

ब्लॉगींग मध्ये तुम्हाला ओरिजनल मजकूर (content) लिहावा लागेल, जो की तुम्ही स्वतः लिहिलेला असेल. तुम्ही इतर कुणी लिहिलेला content कॉपी करून तुमच्या ब्लॉग वर publish करू शकत नाहीत. तुम्ही जर असं केलं तर तुमच्या ब्लॉग वर Copyright strike येऊ शकते आणि तुमचा ब्लॉग ही गूगल बंद करू शकते.

त्यामुळे तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि स्वतः लिहिलेला content च ब्लॉग वर publish करायचा आहे नाहीतर तुमचा ब्लॉग अडचणीत येऊ शकतो.

संयम असणं गरजेचं

ब्लॉगींग मध्ये संयम असणं फार महत्वाचं आहे कारण ब्लॉगींग द्वारे पैसे कमावणे ही खूप वेळ लागणारी प्रक्रिया आहे. यासाठी तुम्हाला ५-६ महिने तरी तुमच्या ब्लॉग साठी द्यावे लागतील . कधी कधी तर पैसे यायला एखादं वर्ष देखील लागतं. त्यामुळे आपल्याकडे संयम असणं फार आवश्यक आहे.

दररोज कित्येक ब्लॉग तयार होतात पण त्यातील काहीच ब्लॉग टिकतात. कारण काही लोक ब्लॉग चालू करून दोन तीन महिने काम करतात आणि कमाई होत नाही म्हणून सोडून देतात. त्यामुळे ब्लॉगींग मध्ये पैसे कमवायचे असतील तर तुमच्याकडे संयम असणं फार गरजेचं आहे.

सोशल मीडिया वर जास्त वेळ वाया जाईल

ब्लॉगींग मध्ये व्ह्यूज मिळवण्यासाठी सोशल मीडिया वर तुमच्या ब्लॉग पोस्ट ला शेअर करावं लागतं, सोशल मीडियावर active राहावं लागतं. त्यामुळे तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुमचा सोशल मीडियावर खुप जास्त वेळ वाया जाऊ शकतो. यामुळे तुमच्या अभ्यासावर देखील परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे.

निष्कर्ष – ब्लॉगिंग चे फायदे आणि नुकसान

मित्रानो आज च्या पोस्ट मध्ये आपण ब्लॉगींग चे फायदे आणि नुकसान जाणून घेतले. ब्लॉगींग चे कोण कोणते फायदे आहेत, ब्लॉगिंग चे नुकसान काय आहेत, इत्यादी. या सर्व गोष्टी आपल्या लक्षात आल्याच असतील.

तर तुम्ही देखील ब्लॉगींग करण्याचे ठरवत आहात तर या सर्व गोष्टी एकदा नक्की लक्षात घ्या. आपण या सर्व गोष्टींचा स्वीकार करत असाल आणि तुमची मेहनत घ्यायची तयारी असेल तरच ब्लॉगींग मध्ये या…

मित्रानो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर खाली काही सोशल मीडिया बटण आहेत त्यावर क्लिक करून ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा…धन्यवाद!!!


या पोस्टला नक्की शेअर करा 😜

Leave a Comment

x